मी उद्धव ठाकरेंना भेटणार, त्यानंतर ते राऊतला चपलेने मारतील: राणे
Narayan Rane Harshly Criticized to Sanjay Raut: मुंबई: शिवसेना (ShivSena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे (BJP) मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. संजय राऊतांनी काल (6 जानेवारी) केलेल्या विखारी टीकेनंतर आता नारायण राणेंनी देखील मुंबईत पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. (i will meet uddhav thackeray then he […]
ADVERTISEMENT

Narayan Rane Harshly Criticized to Sanjay Raut: मुंबई: शिवसेना (ShivSena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे (BJP) मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. संजय राऊतांनी काल (6 जानेवारी) केलेल्या विखारी टीकेनंतर आता नारायण राणेंनी देखील मुंबईत पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. (i will meet uddhav thackeray then he will hit sanjay raut with a shoe said narayan rane)
यावेळी नारायण राणे यांनी थेट म्हटलं की, ‘मी एकदा उद्धव ठाकरेंना भेटणार असून संजय राऊतने मला जे उद्धव आणि रश्मी ठाकरेबद्दल सांगितलं ते त्यांना समजलं तर ते संजय राऊतला चपलेने मारतील.’ असं म्हणत नारायण राणेंनी देखील संजय राऊतांवर टीका केली आहे.
पाहा नारायण राणे नेमकं काय म्हणाले..
‘शिवसेनेच्या पहिल्या 19 जून 1966 पासूनच्या पहिल्या 39 वर्षात शिवसेना वाढविण्यासाठी आणि सर्व काही करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली. संजय राऊतने घेतलेली आहे. आज त्याला जो आनंद होतोय ना हा शिवसेना संपवण्याचा आनंद आहे.56 आमदार होते आता 12 पण नाही राहिले.’
‘कोणाला तो चँलेज देतोय. एक तरी संजय राऊतचं सामाजिक, विधायक, धार्मिक काम आहे का?.. सांगा.. संपादक म्हणून बोध देईल, विकासात्मक लिहलेला लेख दाखवा. पत्रकार म्हणून काही पावित्र्य असतं, आचारसंहिता असते.’