Yogesh Kadam: ‘हा अपघात नव्हता, माझ्या..’, रामदास कदमांच्या मुलाचा आरोप

मुंबई तक

MLA Yogesh Kadam Reaction on Accident: मुंबई: बाळासाहेबांची शिवसेना नेते पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री रामदास कदमांचे (Ramdas Kadam) पुत्र योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांच्या कारला काल (6 जानेवारी) रात्री अपघात (Car Accident) झाल्यानंतर आता त्यांनी याप्रकरणी घातापाताची (attempt to murder) शंका व्यक्त केली आहे. हा नेमका अपघातच होता का याबाबत त्यांना शंका असून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

MLA Yogesh Kadam Reaction on Accident: मुंबई: बाळासाहेबांची शिवसेना नेते पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री रामदास कदमांचे (Ramdas Kadam) पुत्र योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांच्या कारला काल (6 जानेवारी) रात्री अपघात (Car Accident) झाल्यानंतर आता त्यांनी याप्रकरणी घातापाताची (attempt to murder) शंका व्यक्त केली आहे. हा नेमका अपघातच होता का याबाबत त्यांना शंका असून त्यांनी याबाबत पोलिसांनाही काही गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच या अपघाताची चौकशीची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेही करणार असल्याचं योगेश कदम म्हणाले आहेत. (it was not an accident, there is a possibility of attempt to murder Ramdas kadams son mla yogesh kadam expressed doubt)

योगेश कदम यांच्या कारचा पोलादपूरनजीक अत्यंत भीषण अपघात झाला. ज्यामध्ये त्यांच्या कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण याच अपघाताबाबत टीव्ही नाइन या वृत्तवाहिनीशी बोलताना योगेश कदम यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केली आहे. पाहा योगेश कदम नेमकं काय म्हणाले.

रामदास कदमांचे पुत्र आमदार योगेश कदमांच्या गाडीचा भीषण अपघात

’12 टायरचा डंपर 100-125 च्या स्पीडने धडकला, हा अपघात नव्हता’, योगेश कदमांनी व्यक्त केली घातापाताची शंका.

हे वाचलं का?

    follow whatsapp