राज ठाकरेंच्या भेटीत बाबासाहेब पुरंदरेंवर काय चर्चा झाली? : जयसिंगराव पवार यांचा खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोल्हापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांची नुकतीच कोल्हापूरमध्ये भेट झाली. याबाबत स्वतः राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमधून माहिती दिली. मरहट्ट्यांच्या गनिमी काव्यापासून अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. तर आपल्याही अनेक गोष्टी राज ठाकरे यांनी मान्य केल्याचं पवार यांनी सांगितलं होतं.

मात्र या भेटींमध्ये आणि भेटीनंतर माध्यमांमध्ये बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या इतिहासाविषयी चर्चा झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. यात जयसिंगराव पवार यांनी पुरंदरेंचा इतिहास चुकीचा नसल्याचं मत व्यक्त केल्याच्याही बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. मात्र या सर्व चर्चा आणि बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं सांगत जयसिंगराव पवार यांनी स्वतः यावर खुलासा केला आहे.

जयसिंगराव पवार काय म्हणाले?

राज ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये माझी भेट घेण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते माझ्या निवासस्थानी आले. तेव्हा इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटातून होणारा विपर्यास यावर चर्चा झाली. मी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देऊन आजच्या काळाच्या संदर्भात त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रबोधनकारांचा विचार घेऊन मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यावर आपण महाराष्ट्रात धडाकेबाज काम कराल त्याचे मी स्वागत करीन, असे मी म्हणालो. माध्यमांमध्ये या विधानाची अतिशयोक्ती झाली. यावेळी त्यांच्याशी बाबासाहेब पुरंदरेंवर काहीही चर्चा झाली नाही.

ADVERTISEMENT

राज ठाकरे निघून गेल्यावर पत्रकारांनी पुरंदरेंबद्दल प्रश्न विचारल्यावर मी त्यांचा इतिहासकार म्हणून गौरवीकरण करणारे विधान केलेले नाही. कारण आतापर्यंत लिखाणातून, संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत व अनैतिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली आणि त्यावर आजही मी ठाम आहे. यासंदर्भात वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे माझ्या वैचारिक भूमिकांबद्दल संभ्रम निर्माण होत आहे, म्हणून हा खुलासा देत आहे.

ADVERTISEMENT

जयसिंगराव पवार काय म्हणाले होते माध्यमांशी बोलताना?

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना पवार म्हणाले होते, राज ठाकरेंबद्दल कुठल्या विषयावर चर्चा होणार याबद्दल काही ते ठरवून आले नव्हते. माझं आयुष्य इतिहासाला वाहिलेलं आहे. त्यामुळे चर्चाही इतिहासावरच होणार हे निश्चित. खरा इतिहास नेमका काय? त्यातून निर्माण होणाऱ्या कलाकृती नेमक्या कशा असायला हव्यात याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी ते मान्यही केलं.

यावेळी पत्रकाराने राज ठाकरे यांनी यापूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाचा पुरस्कार केला आहे. आता ते खऱ्या इतिहासाकडे वळालेत असं म्हणायचं का? असा सवाल विचारला. यावर बोलताना पवार म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेला सर्वच इतिहास चुकीचा आहे, असं कसं म्हणता येईल? शेवटी कागदोपत्री मांडता येतो तो खरा इतिहास. त्यावेळी बाबासाहेबांच्या काही गोष्टी मला स्वीकाराव्याश्या वाटल्या नाहीत त्या त्या वेळी मी ते स्पष्ट केलेलं आहे. पण आज त्याची उजळणी करण्याची काही कारण नव्हतं. तसा विषयही काही निघाला नाही.

बाबासाहेबांचं नाव निघालं का? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, बाबासाहेबांची त्यांनी दोन-तीन वेळा आठवण काढली. बाबासाहेबांशी अशी चर्चा झाली, तशी चर्चा झाली याबाबत त्यांनी सांगितलं. तसंच शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांच्यातील चर्चेबद्दलही त्यांनीही सांगितलं.”, असेही पवार म्हणाले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT