‘केसीआर यांच्या डोक्यात किडा घुसलाय’, ठाकरेंचे दोन सवाल अन् इशारा
केसीआर महाराष्ट्रात आले, ते भगीरथ भालके यांच्या पक्षप्रवेशानिमित्ताने. त्यांनी केलेले शक्तिप्रदर्शन चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं. त्यांनी विठुरायाचे दर्शनही घेतले. या सगळ्यांवर भाष्य करताना ठाकरेंनी सामना अग्रलेखातून सुनावलं आहे.
ADVERTISEMENT

KCR Maharashtra : महाराष्ट्रात सध्या ज्या नावाची चर्चा सुरू आहे, ते म्हणजे केसीआर, अर्थात के. चंद्रशेखर राव! केसीआर यांनी महाराष्ट्र दौऱ्यात प्रचंड शक्तिप्रदर्शन केले. राव महाराष्ट्रातील मतदारांवर किती प्रभाव टाकणार याबद्दल वेगवेगळे कयास लावले जात आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केसीआर यांच्यावर भाजपची टीम बी असल्याचा शिक्का मारला आहे. काही महिन्यांपूर्वी मातोश्रीवर येऊन गेलेल्या केसी राव यांच्यावर ठाकरेंनी तोफ डागली आहे. ठाकरेंनी सामना अग्रलेखात काय म्हटलंय, तेच पाहुयात…
केसीआर महाराष्ट्रात आले, ते भगीरथ भालके यांच्या पक्षप्रवेशानिमित्ताने. त्यांनी केलेले शक्तिप्रदर्शन चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं. त्यांनी विठुरायाचे दर्शनही घेतले. या सगळ्यांवर भाष्य करताना ठाकरेंनी सामना अग्रलेखातून सुनावलं आहे.
राष्ट्रीय राजकारणाचा किडा
अगदी सुरुवातीलाच सामना अग्रलेखात राव यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेबद्दल भाष्य केलंय. “तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समिती असा पक्ष स्थापून राष्ट्रीय राजकारणात येण्याचे नक्की केले. खरं तर त्याची गरज नव्हती. त्यांचा एक प्रादेशिक पक्ष होता व त्यांचे उत्तम चालले होते, पण राष्ट्रीय राजकारणाचा किडा राव यांच्या डोक्यात घुसला तो घुसलाच”, असं म्हटलं आहे.
हेही वाचा >> Devendra Fadnavis: ‘काळं तोंड, नालायक.. मालक’, फडणवीस-खडसेंमध्ये पार जुंपलीच; दोघंही..
“2024 मध्ये केसीआर यांचा पक्ष सत्तेत राहील की जाईल, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. केंद्रीय तपास यंत्रणा दबावाचे राजकारण करीत असल्या तरी आम्ही त्यांच्यापुढे झुकणार नाही, लढत राहू, अशी गर्जना केसीआर यांनी केली. मात्र त्यानंतर ते जी राजकीय पावले टाकत आहेत ती भाजपास अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचीच आहेत”, असं म्हणत ठाकरेंनी केसीआर हे भाजपला मदत करत असल्याचा ठपका ठेवला आहे.










