पवारांविरोधातील पोस्ट नडणार.. अभिनेत्री केतकीलाही सदावर्तेंसारखं महाराष्ट्र दर्शन घडणार?
मुंबई: गुणरत्न सदावर्तेंच्या बाबतीत घडलं, तसंच केतकी चितळेबद्दलही घडतं आहे. सदावर्तेंनी केलं तेच केतकीनंही केलं आणि दोघांमध्ये एक समान धागाही आहे. याच धाग्यामुळे सदावर्तेंसारखंच केतकीला पोलिसांकडून महाराष्ट्र दर्शन घडेल, असं दिसतं आहे. त्यामुळेच आपण सदावर्तेंच्या पावलावर पाऊल टाकत केतकीच्या केसची आगेकूच कशी सुरू आहे. तिच्याविरुद्ध कुठेकुठे गुन्हे दाखल झाले आहेत हेच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. […]
ADVERTISEMENT

मुंबई: गुणरत्न सदावर्तेंच्या बाबतीत घडलं, तसंच केतकी चितळेबद्दलही घडतं आहे. सदावर्तेंनी केलं तेच केतकीनंही केलं आणि दोघांमध्ये एक समान धागाही आहे. याच धाग्यामुळे सदावर्तेंसारखंच केतकीला पोलिसांकडून महाराष्ट्र दर्शन घडेल, असं दिसतं आहे. त्यामुळेच आपण सदावर्तेंच्या पावलावर पाऊल टाकत केतकीच्या केसची आगेकूच कशी सुरू आहे. तिच्याविरुद्ध कुठेकुठे गुन्हे दाखल झाले आहेत हेच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी केतकी चितळेला ठाण्यातील कळवा पोलिसांनी अटक केली. तुरुंगाची हवा खावी लागली. 18 मेपर्यंत कोर्टानं पोलिस कोठडी सुनावली आहे. यानंतर केतकीच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. रोज नवनव्या तक्रारी, गुन्हे तिच्या विरोधात दाखल होत आहेत. अगदी असचं वकील गुणरत्न सदावर्तेंच्या बाबतीतही घडलं.
पवारांच्या सिल्व्हर ओकसमोरील राडा प्रकरणात सदावर्तेंना मुंबई पोलिसांनी अटक केली. यानंतर एका प्रकरणात जामीन मिळताच सदावर्तेंना दुसऱ्या प्रकरणात अटक झाली. वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले. एफआयआर कुंडलीमुळे सदावर्तेंना मुंबई, सातारा, कोल्हापूर असं महाराष्ट्र दर्शन घडलं. केतकी आणि सदावर्तेंमधला समान धागा हा शरद पवार आहेत.
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात केतकीनं कोर्टात स्वतःच युक्तीवाद केला. वकील असलेल्या सदावर्तेंनीही मुंबईच्या कोर्टात एकदा स्वतःच युक्तीवाद केला होता. आता आपण केतकीविरोधात कुठे-कुठे गुन्हे दाखल झालेत, ते बघूया.