विधान परिषद निवडणूक 2023: पाच मतदारसंघात कोण कोणाला भिडणार?

मुंबई तक

Vidhan Parishad Election 2023 Constituency: मुंबई: राज्यातील शिक्षक-पदवीधर विधान परिषदेची बहुचर्चित निवडणूक (Teacher-Graduate Legislative Council Election) ही 30 जानेवारीला होणार आहे. यात नाशिकच्या (Nashik) पदवीधर मतदारसंघाने तर रंगतच आणली आहे. अगदी 6-7 महिन्यांपूर्वीच राज्यात झालेल्या विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीतच सत्तांतराची पेरणी झाली होती. आताही असं काही होईल याचा आम्ही दावा करत नाही, पण निवडणुकीतील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Vidhan Parishad Election 2023 Constituency: मुंबई: राज्यातील शिक्षक-पदवीधर विधान परिषदेची बहुचर्चित निवडणूक (Teacher-Graduate Legislative Council Election) ही 30 जानेवारीला होणार आहे. यात नाशिकच्या (Nashik) पदवीधर मतदारसंघाने तर रंगतच आणली आहे. अगदी 6-7 महिन्यांपूर्वीच राज्यात झालेल्या विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीतच सत्तांतराची पेरणी झाली होती. आताही असं काही होईल याचा आम्ही दावा करत नाही, पण निवडणुकीतील घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत नेमकं कुणाविरोधात कोण उभे आहेत, कोणत्या मतदारसंघात कोणत्या लढती आहेत हे आपण सविस्तर समजून घ्या. (Legislative Council Elections 2023: Who Will Contest Against Whom in Five Constituencies?)

नाशिक पदवीधर मतदारसंघ

सगळ्यात आधी आपण नाशिक पदवीधर मतदार संघाबाबत जाणून घेऊया. कारण तिथे ऐनवेळेला उलटफेर झाला आहे. 11 जानेवारीला विद्यमान आमदार सुधीर तांबे घोषणा करतात की ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज भरणार. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी सुधीर तांबेंचे पुत्र सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. AB फॉर्म त्यांना काँग्रेसचा काही मिळाला नाही.

नाशिकमध्ये भाजपचा किंवा भाजप पुरस्कृत म्हणून कुणी उमेदवार मैदानात नाही. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या पॉवरफुल उमेदवार म्हणून सत्यजित तांबेंकडेच पाहिलं जात आहे. त्यात त्यांनी इतर पक्षांकडेही पाठिंबा मागितला आहे.

भाजपचेचे नगर जिल्ह्यातून येणारे मातब्बर नेते विखे-पाटलांनी तर आधीच म्हटलं आहे की सत्यजित तांबे भाजपच्या उमेदवारीवर लढले तर स्वागतच आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांचा विधिमंडळाचा मार्ग हा मोकळा झाला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त धनराज विसपुते (अपक्ष) आणि धनंजय जाधव (अपक्ष) हे ही रिंगणात आहेतच.

हे वाचलं का?

    follow whatsapp