MLC Election Results 2023 : ‘3 विरुद्ध 1’; विधान परिषद निकालात ‘मविआ’ची सरशी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात 5 जागांवर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. 5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीने, एका जागेवर भाजपने तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. 

वंचित बहुजन आघाडीच्या अनिल अमलकरांच्या मतमोजणीनंतर धीरज लिंगाडे यांना १४५३ मते तर रणजीत पाटलांना अमलकरांची ६२५ मते मिळाली. दुसऱ्या फेरीतही लिंगाडे यांनी आघाडी कायम ठेवतं डॉ. पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव केला.

धीरज लिंगाडे : 44011

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रणजीत पाटिल : 41548

3090 कोटा पूर्ण करण्यासाठी मतांची गरज. वंचित बहुजन आघाडीच्या अनिल अमलकर यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू. अमलकरांची मतमोजणी संपल्यानंतर ज्याला सर्वाधिक मत तो विजयी घोषित होण्याची शक्यता. त्यांना 4213 मतं मिळाली आहेत.

ADVERTISEMENT

16 उमेदवार बाद झाल्यानंतर काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांना 43806 मतं तर रणजीत पाटलांना 41383 मतं मिळाली आहेत. काँग्रेसचे धीरज लिंगाडे हे 2423 मतांनी आघाडीवर असून कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना 3295 मतांची गरज आहे.

ADVERTISEMENT

अमरावती मतदारसंघात विजयाचा कोटा ’47 हजार 101′ इतका निश्चित करण्यात आला आहे. लिंगाडे यांना हा कोटा पूर्ण करण्यासाठी 3 हजार 584 मतं अद्याप कमी आहेत. तर डॉ. पाटील यांना 5 हजार 930 मतांची गरज आहे. सध्या दुसऱ्या पसंती क्रमाच्या मतांची मोजणी सुरु आहे.

बाद मतांची फेरमोजणी करण्यात आल्यानंतर 8 हजार 735 बाद मतांपैकी जवळपास 348 मतं वैध ठरली आहे. यापैकी काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना १७७ मत मिळाली. तर रणजीत पाटील यांना १४५ मत मिळाली.

मतांची आकडेवारी

धीरज लिंगाडे – 43632

डॉ. रणजीत पाटील -41260

सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये १२ उमेदवार बाद झाले आहेत. पण अद्याप कोणालाही विजयी घोषित करण्यात आलेलं नाही.

मतांची आकडेवारी

धीरज लिंगाडे – 43632

डॉ. रणजीत पाटील -41260

रणजीत पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे बाद मतांची फेरमोजणीही करण्यात आली आहे.

अमरावती पदवीधर निवडणूक निकाल: रणजीत पाटलांची निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य केली मागणी

या निवडणुकीमध्ये एकूण वैध मते 93852 तर अवैध मते 8735 असून या अवैध मतांवर भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांनी पुन्हा फेर तपासणीसाठी अर्ज केला होता. त्यांचा हाच अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मान्य करत त्यावर दहा टेबलवर सुरू केली आहे. त्यामुळे या निवडणुकीचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे.

अमरावती निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झालेल्या 8735 मतांची फेरतपासणी होणार आहे.

अमरावती पदवीधर निवडणूक निकाल: रणजीत पाटील करणार फेर मतमोजणीची मागणी

अमरावतीच्या पदवीधर निवडणुकीत झालेल्या मतमोजणीमध्ये 7 ते 8 हजारांच्यावर अवैध ठरलेल्या मतपत्रिकांचे पुन्हा परीक्षण करावे. अशी मागणी भाजपचे उमेदवार रणजीत पाटील करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासंबंधीचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केल्याची सूत्रांची माहिती आहे.

अमरावती पदवीधर निवडणूक निकाल, चौथी फेरी

काँग्रेसचे धीरज लिंगाडे 2313 मतांनी आघाडीवर आहेत.

धीरज लिंगाडे यांना 43340 तर रणजीत पाटील यांना 41027 मतं मिळाली आहेत.

एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456. एकूण मोजलेले मतदान 84000

सत्यजित सुधीर तांबे : 45660

शुभांगी भास्कर पाटील : 24927

सत्यजीत तांबे विजयाच्या उंबरठ्यावर. तांबे यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु. कार्यकर्त्यांनी पेढा भरवून केला जल्लोष.

नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक

दुसरी फेरी अखेर (एकूण मोजलेली मतं – 56000)

  • एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456

  • वैध मते – 50555

  • अवैध मते – 5445

  1. सत्यजित सुधीर तांबे : 31009

  2. शुभांगी भास्कर पाटील : 16316

  3. रतन कचरु बनसोडे : 1157

  4. सुरेश भिमराव पवार : 360

  5. अनिल शांताराम तेजा : 46

  6. अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 100

  7. अविनाश महादू माळी : 623

  8. इरफान मो इसहाक : 28

  9. ईश्वर उखा पाटील : 89

  10. बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 295

  11. ॲड. जुबेर नासिर शेख : 103

  12. ॲड.सुभाष राजाराम जंगले : 104

  13. नितीन नारायण सरोदे : 129

  14. पोपट सिताराम बनकर : 37

  15. सुभाष निवृत्ती चिंधे : 83

  16. संजय एकनाथ माळी : 76

एकूण मते: 50,555

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव केला आहे.

नाशिक विभाग पदवीधर निवडणूक

  • नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर निवडणूक निकाल पहिली फेरी

  • एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456

  • वैध मते -25,259

  • अवैध मते – 2741

    =====================

  • सत्यजित सुधीर तांबे -15784

  • शुभांगी भास्कर पाटील -7862

  • रतन कचरु बनसोडे-560

  • सुरेश भिमराव पवार-225

  • अनिल शांताराम तेजा-28

  • अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर-51

  • अविनाश महादू माळी -268

  • इरफान मो इसहाक-18

  • ईश्वर उखा पाटील-45

  • बाळासाहेब रामनाथ घोरपडे-142

  • ॲड. जुबेर नासिर शेख-54

  • ॲड.सुभाष राजाराम जंगले-46

  • नितीन नारायण सरोदे-63

  • पोपट सिताराम बनकर-24

  • सुभाष निवृत्ती चिंधे-46

  • संजय एकनाथ माळी-43

  • एकूण 25,259 मते

नागपुरात मविआची मुसंडी! भाजप पराभवाच्या छायेत

विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघातील निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात 28 हजार मतदान झालं. त्यापैकी आतापर्यंत महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांना 14 हजार 71 मते मिळाली असून, भाजप पुरस्कृत नागो गाणार यांना 6 हजार 9 मते मिळाली आहेत. अजून 6 हजार 340 मतांची मोजणी शिल्लक आहे. त्यामुळे अडबाले यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, मतमोजणीदरम्यान गोंधळ झाला. मतमोजणी केंद्रातील टेबल क्रमांक 13 वर गोंधळ झाला. त्यामुळे महसूल आयुक्तांनी पोलिसांना पाचारण करावं लागलं.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निकाल : राष्ट्रवादीचे विक्रम काळे आघाडीवर

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनी मोठी आघाडी घेतलीये. विक्रम काळे यांना आतापर्यंत 20,078 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना 13,489 मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकांत संग्राम विश्वासराव यांना 13, 543 मते मिळाली आहेत.

औरंगाबादे, अमरावतीत, नागपुरात मविआ आघाडीवर

-विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले पाच हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर.

-सुधाकर अडबाले यांना आतापर्यंत 28 पैकी 18 टेबलवर 10 हजारांच्या सुमारास मते.

-त्या तुलनेत नागो गाणार यांना फारच कमी मते, गाणार दुसऱ्या तर शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे तिसऱ्या क्रमांकावर.

कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक अपडेट

एकूण मतदान – 35069

  • वैध मते 33450

  • अवैध मते – 1619

  • कोटा – 16726

  1. ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे – 20683

  2. बाळाराम दत्तात्रेय पाटील – 10997

  3. धनाजी नानासाहेब पाटील – 1490

  4. उस्मान इब्राहिम रोहेकर – 75

  5. तुषार वसंतराव भालेराव – 90

  6. रमेश नामदेव देवरुखकर – 36

  7. राजेश संभाजी सोनवणे – 63

  8. संतोष मोतीराम डामसे – 16

-महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांची मोठी आघाडी

-महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू

-भाजप पुरस्कृत नागो गाणार हे मोठ्या फरकाने पिछाडीवर

मतमोजणी प्रक्रिया सुरू होताच आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पैठण्यांसह पैसे वाटल्याचा आरोप अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी सत्यजित तांबे यांच्यावर केला. तांबे यांनी दोन्ही राष्ट्रीय पक्षांना फसवल्याचंही जंगले यांनी म्हटलं आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघावर भाजपचा झेंडा

राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकीपैकी एका मतदारसंघाचा निकाल हाती आला आहे. ज्यामध्ये भाजपने मविआला जोरदार धक्का दिला आहे.

भाजप-युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांचा पहिल्याच फेरीत पराभव केला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा

MLC Election Result: BJPने कोकणात मविआला लोळवलं, म्हात्रे ठरले जायंट किलर!

कोकण मतदारसंघातील पहिल्या फेरीचा निकाल

28 पैकी 15 टेबलवरील 18750 मतापैकी शिंदे-भाजपा गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 10630 मतं

नागपूर विभाग शिक्षक निवडणूक निकाल अपडेट

मतमोजणीसाठी strong रुम उघडली –

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची ८ वाजेपासून सुरु झाली मतमोजणी

– मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त

– नागपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले, भाजप समर्थित नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यात प्रमुख लढत

– सहा जिल्ह्यात सरासरी ८६.२६ टक्के मतदान

– एकूण ३४ हजार ३४९ मतदारांनी केलं मतदान

– नागपूर जिल्ह्यात १३ हजार ४२० मतदारांचं मतदान

– नागपूरकर मतदारांचा कौल ठरवणार निकालाची दिशा

– एकूण २८ मतमोजणी टेबलवर मतमोजणी

– आधी सहाही जिल्ह्यातील मतपत्रिकांचं मिक्सिंग होणार

– प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका याप्रमाणे मतमोजणी

– वैध मतांच्या ५० टक्के मतं अधिक एक असा ठरणार कोटा

अमरावती पदवीधर निवडणूक निकाल

-1,02,403 मतदारांनी केलं मतदान

-28 टेबलवर मतमोजणी

-विभागीय आयुक्तांसह अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पार पाडणार मतमोजणी प्रक्रिया.

-एकूण 23 उमेदवार रिंगणात.

-भाजपचे डॉ. रणजित पाटील आणि महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांच्यात थेट लढत

‘विजय आपलाच आहे’, निकालआधी शुभांगी पाटलांचं विधान

सत्यजित तांबे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत असलेल्या मविआ पुरस्कृत शुभांगी पाटील यांनी आपणच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मतमोजणी केंद्रावर आल्यानंतर बोलताना शुभांगी पाटील म्हणाल्या, “ही लढत जनतेची होती. जनतेचा कौल नक्कीच माझ्या पाठीमागे आहे. मला भेटण्यासाठी रस्त्यावर रस्त्यावर लोकं होते. जनता जिंकणार आहे, विजय आपलाच आहे. अनेकांचे प्रश्न मी सोडवले आहे. आमदार नसताना मी अनेक कामे केली, त्यामुळे जनतेला विश्वास आहे की, ही आमदार झाल्यावर दहा पट जास्त काम करेल. मी संघर्षाचा वारसा घेतला आहे असून, मतमोजणी फक्त फॉर्मालिटी बाकी आहे, विजय आपलाच आहे”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधान परिषद : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकाल

-मतमोजणी साठी 2 हॉल असून, एकूण 28 टेबल आहेत.

– 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा असे सर्व मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करून त्याची एका हौदात सरमिसळ करण्यात आली आहे.

– आतापर्यंत सर्व 98 मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत.

– प्रत्येक टेबलवर 1,250 मतपत्रिका देण्यात येतील. त्यानंतर वैध व अवैध मतांची मोजणी होईल.

कोकण शिक्षण मतदारसंघ

विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 91.02 टक्के मतदान झालं होतं.

-एकूण 38 हजार 529 मतदार

-35 हजार 75 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हानिहाय मतदार

ठाणे – एकूण मतदार 15300 – झालेलं मतदान 13595 =

रायगड – एकूण मतदार 10101 – झालेलं मतदान – 9452

पालघर – एकूण मतदार 6844 – झालेलं मतदान – 6013

रत्नागिरी – एकूण मतदार 4120 – झालेलं मतदान- 3909

सिंधुदुर्ग -एकूण मतदार 2164 – झालेलं मतदान 2106

MLC election Results : विजयाचा कोटा ठरविण्याचं सूत्र

पदवीधर निवडणुकीत विजयाचा कोटा ठरविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं एक सूत्र घालून दिलं आहे. त्यानुसार अवैध मतपत्रिका बाजूला केल्यानंतर राहिलेलेल्या वैध मतपत्रिकांतून हा कोटा निश्चित केला जाणार आहे.

सूत्र : वैध मतपत्रिका + १ भागिले 2 = येणारी संख्या ही विजयी कोटा असेल.

Mlc election 2023 : जायंट किलर पाटील विरुद्ध लिंगाडे, कुणाचं पारडं जड?विधान परिषद: सत्यजीत तांबेंना भिडणारी ‘वाघीण’; कोण आहेत शुभांगी पाटील?

नाशिक पदवीधर मतदारसंघ निकाल : शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजित तांबे

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघात कुणाचा निकाल लागणार, याची उत्सुकता आहे. महत्त्वाचं म्हणजे नाशिकमध्ये सत्यजित तांबे, सुधीर तांबे यांच्याबरोबरच भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. हा मतदारसंघ गेल्यावेळी काँग्रेसकडे होता. तिथे आता मविआ पुरस्कृत शुभांगी पाटील असून, भाजपचं मतदान सत्यजित तांबे यांच्या बाजूनं झालेलं आहे. त्यामुळे ही लढत महत्त्वपूर्ण आहे.

राष्ट्रवादी ते महाविकास आघाडी… Shubhangi Patil यांचं एक वर्तुळ पूर्ण!

MLC Election Results 2023 Live News Updates : विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपनं जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीला धूळ चारलीये. दुसरीकडे नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती मतदारसंघातील मतमोजणी सुरू असून, कोण जिंकणार याची उत्सुकता क्षणाक्षणाला शिगेला चाललीये.

लाईव्ह अपडेट्स आणि निकाल समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा

Satyajeet Tambe: गेम नेमका कोणाचा झाला, तांबे पिता-पुत्रांचा की..?

MLC Election Results 2023 Live Updates : निवडणूक लढवत असलेले उमेदवार

नाशिक पदवीधर : अपक्ष शुभांगी पाटील (महाविकास आघाडी पुरस्कृत) विरुद्ध अपक्ष सत्यजित तांबे (भाजपचा पाठिंबा)

अमरावती पदवीधर : धीरज लिंगाडे (काँग्रेस) विरुद्ध डॉ. रणजित पाटील (भाजप)

कोकण शिक्षक : बाळाराम पाटील (शेकाप) विरुद्ध ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप)

औरंगाबाद शिक्षक : विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध किरण पाटील (भाजप)

नागपूर शिक्षक : सुधाकर अडबाले (काँग्रेस पुरस्कृत) विरुद्ध नागो गाणार (भाजप पुरस्कृत)

Family Man ते निवडणुकीत ट्विस्ट आणणारा नेता, कोण आहेत Satyajeet Tambe?

जुनी पेन्शन योजना निवडणुकीत ठरला कळीचा मुद्दा

राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या काँग्रेसशासित, तर आम आदमी पार्टीची सत्ता असलेल्या पंजाब आणि झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार असलेल्या झारखंड अशा पाच राज्यांमध्ये जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा या योजनेला विरोध होता, मात्र प्रचाराच्या काळात भूमिका बदलल्याचं दिसून आलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT