Sharad Pawar : ”एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपच, अजित पवारांना माहित नाही”

मुंबई तक

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामागे भाजपच आहे. अजित पवारांना त्याची माहिती नसेल. असं वक्तव्य शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं. सरकार टिकणार आहे की नाही हे विधानसभेतलं बहुमत ठरवेल, महाविकास आघाडी सरकार सिद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंडखोर आमदारांना त्यांचं बहुमत सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रात यावंच लागेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामागे भाजपच आहे. अजित पवारांना त्याची माहिती नसेल. असं वक्तव्य शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं. सरकार टिकणार आहे की नाही हे विधानसभेतलं बहुमत ठरवेल, महाविकास आघाडी सरकार सिद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंडखोर आमदारांना त्यांचं बहुमत सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रात यावंच लागेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप असेल असं वाटत नाही हे वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्याबाबत शरद पवार यांना विचारलं असता त्यांना इथली स्थानिक माहिती आहे, देशातली माहिती मला आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

”अजित पवार यांना इथली स्थानिक माहिती आहे. पण गुजरात आणि आसाम या राज्यांमधली परिस्थिती आम्हाला जास्त माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. हा राष्ट्रीय पक्ष भाजपच आहे. गुजरात आणि आसामला एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांची जी व्यवस्था करण्यात आली ती कुणी केली ते मला माहित आहे. ते लोक अजित पवारांच्या परिचायचे असतील असं वाटत नाही” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.