Maratha Reservation : जरांगेंचा सरकारला इशारा’, ‘…तिथपर्यंत आंदोलन संपणार नाही’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

manoi jarange meet shinde government delegation rally reach lonavala maratha reservation
manoi jarange meet shinde government delegation rally reach lonavala maratha reservation
social share
google news

Manoj jarange Patil, Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. त्यात बुधवारी कोर्टाने सरकारला फटकारल्यानंतर शिष्टमंडळाने आज आंदोलन मुंबईत येण्यापूर्वीच जरांगेसोबत चर्चेची तयारी दर्शवली. मात्र जरांगेंनी (Manoj jarange Patil) शिष्टमंडळाच्या बैठकीला न जाता मराठा आंदोलकांची चर्चा केली. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी सभेत बोलताना मराठ्यांच पहिल आंदोलन शांततेत पार पडलं. आता दुसरं आंदोलनही शांततेत पार पाडत आरक्षण घेऊनच आपल्याला जायचं आहे. दुसऱ्यांदा आपल्याला इतिहास घडवायचा आहे, असा विश्वास जरांगेंनी आंदोलकांमध्ये व्यक्त केला.(manoi jarange meet shinde government delegation rally reach lonavala maratha reservation)

मनोज जरांगेंशी चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झाले आहे. यावेळी या शिष्टमंडळाच्या बैठकीला जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी सभा घेऊन आंदोलकांशी चर्चा केली. आपल्याला मुंबईकडे जायचं आहे. वाशीचा शेवटचा मुक्काम राहिला आहे. आणि मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा : संदीप राऊतांच्या ED नोटीसीवर राऊत कडाडले, ‘फडणवीसांच राज्य आहे की अफजलखान…’

आपण दिलेला शब्द पाळतो हे सिद्ध केलं आहे. मुंबईत शांततेत जाणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही. या भूमिकेवर आम्ही ठाम राहणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले आहे. मुंबईत शांततेत आंदोलन करायचं, खायचं, प्यायचं आणि झोपायच. तसेच लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ करतोय का याकडे लक्ष ठेवायचंय, असेही जरांगेंनी मराठा आंदोलकांना आवाहन केले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शेवटच्या व्यक्तीला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन संपणार नाही.त्यामुळे शिष्टमंडळाने काय आणलंय ते पाहतो आणि त्यांच्याशी चर्चा करतो. आमच्या समजाचा त्यात हित असलं आणि आमच्या मागण्या मान्य केल्या असल्या तर ठीक नाहीतर चलो मुंबई, असे देखील जरांगे यांनी सांगितले . आम्हाला आरक्षण हवंय कुठेही दिले तरी चालेल, पुण्यात जरी मिळालं तरी घेणार, वाशीत जरी मिळालं तर घेणार आणि मुंबईत जरी मिळालं तरी घेणार असल्याचे जरांगेंनी सांगितले आहे. तसेच बैठकीत जी चर्चा होईल ती तुम्हाला येऊन सांगतो. तुम्हाला विचारल्याशिवाय कुठला निर्णय होणार नाही, असे देखील जरांगेंनी मराठा आंदोलकांना सांगितले आहे.

हे ही वाचा : जुन्या प्रेमाचा रक्तरंजीत शेवट; 21 वर्ष लहान प्रेयसीला मॅनेजरने ऑफिसमध्येच भोसकलं!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT