राज ठाकरे: उत्तम व्यंगचित्रकार ते रोखठोक राजकारणी! कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच गटप्रमुखांच्या मेळाव्यात केलेलं भाषण चांगलंच गाजलं. तसंच राज ठाकरे हे आता कोकण दौराही करत आहेत. कोल्हापुरात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा उत्तम पर्याय कसा ठरू शकतो हेदेखील राज ठाकरेंनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात सांगितलं. राज ठाकरे हे उत्तम राजकारणी आहेत. शिवसेनेपासून त्यांच्या राजकीय वाटचालीची […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच गटप्रमुखांच्या मेळाव्यात केलेलं भाषण चांगलंच गाजलं. तसंच राज ठाकरे हे आता कोकण दौराही करत आहेत. कोल्हापुरात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा उत्तम पर्याय कसा ठरू शकतो हेदेखील राज ठाकरेंनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात सांगितलं. राज ठाकरे हे उत्तम राजकारणी आहेत. शिवसेनेपासून त्यांच्या राजकीय वाटचालीची सुरूवात झाली. त्यानंतर पुढे जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष त्यांनी स्थापन केला. आपण जाणून घेणार आहोत की राज ठाकरेंचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास कसा आहे.

महाराष्ट्रातल्या ठाकरे या घराण्यातले महत्त्वाचे राजकारणी
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष १९ जून १९६६ ला स्थापन केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत महत्त्वाच्या नेत्यांची दुसरी फळीही तयार केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्याच फळीतले एक महत्त्वाचे नेते ठरले. राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या आधी राजकारणात आले. वयाने उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा लहान असूनही राज ठाकरे यांचा शिवसेनेतला अनुभव त्यांच्यापेक्षा मोठा ठरला. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही ही बाब त्यांच्या एका मुलाखतीत विशद केली होती.











