'आता शांत बसणार नाही,' संजय राठोडांनी सोडलं मौन; चित्रा वाघ यांना दिला हा इशारा!

Minister Sanjay rathod on bjp leader chitra wagh
Sanjay rathod on chitra wagh
Sanjay rathod on chitra wagh

एकनाथ शिंदे यांच्या गटातील संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्याने सर्वत्र टीका होत आहे. भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील मंत्रिपद देणं अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. पूजा चव्हाण हिच्या मृत्याला संजय राठोड हे कारणीभूत असल्याचा वाघ यांचा दावा आहे. म्हणून आपण संजय राठोड यांच्या विरोधातील लढा सुरूच ठेवणार, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली आहे. यासर्व मुद्यांवर अखेर संजय राठोड यांनी मौन सोडलं आहे. त्यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे.

काय म्हणाले संजय राठोड?

चित्रा वाघ यांच्या आरोपावर संजय राठोड यांनी माध्यम प्रतिनिधींना बोलताना असंच सुरु राहिलं तर आपण कायदेशीर मार्ग अवलंबनार आहे, असा इशारा दिला आहे. माझा राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रकार झाला तरी त्याला मी सामोरे गेलो. निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी बाजूला झालो. स्वतःहून राजीनामा दिला. आज त्या प्रकरणाची चौकशी झाली आहे. पोलिसांनी त्याबाबतीत राजपत्र प्रकाशित केले आहे. मी निश्कलन्क आहे, असं संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणी बोलताना म्हणाले.

चित्रा वाघांना अप्रत्यक्षपणे दिला इशारा

न्याय व्यवस्थेवर मला विश्वास होता. म्हणून मी शांत होतो. शेवटी सर्व सत्य बाहेर आले आहे. माझा परिवार आहे, कार्यकर्ते आहेत, या आरोपाचा त्रास होतो, असं संजय राठोड म्हणाले. चार वेळेस मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो आहे. असं असतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं नसतं, असं ते म्हणाले. लोकशाहीमध्ये बोलायचा अधिकार आहे. परंतु काय बोलावं, कसं बोलावं, कारण मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे मी यापुढे कायदेशीर मार्ग स्वीकारणार आहे, कायदेशीर नोटीस पाठवणार आहे, असा इशारा संजय राठोड यांनी चित्रा वाघ यांचं नाव न घेता दिला आहे.

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

चित्र वाघ यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून भूमिका स्पष्ट केली आहे. त्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, 'पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे….जितेंगे. अशी फेसबुक पोस्ट चित्र वाघ यांनी लिहली आहे. त्यामुळे चित्र वाघ या पुढील काळात संजय राठोड यांच्या विरोधात काय पाऊल उचलतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काय आहे पूजा चव्हाण प्रकरण?

पुण्यात वास्तव्य करणाऱ्या पूजा चव्हाण या मुलीने आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या आत्महत्येचं प्रकरण सोशल मीडिया, प्रसारमाध्यमं सगळीकडेच गाजलं. पूजा चव्हाण ही सोशल मीडियावर बरीच Active होती कारण ती टिकटॉक स्टार होती. तिच्या मृत्यूनंतर सुमारे 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आणि त्यानंतर भाजपने संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. चित्रा वाघ यांनी यादरम्यान संजय राठोड यांच्या विरोधात मोर्चा खोलला होता. अखेर या प्रकरणामुळे संजय राठोड यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा त्यांची शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in