सीमावाद: ‘म्हणून आम्ही कर्नाटकात गेलो नाही..’, शंभूराज देसाईंनी सांगितलं खरं कारण
Shambhuraj Desai: मुंबई: महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka) यांच्यातील सीमावाद (Border Dispute) चांगलाच उफाळून आला आहे. हा वाद गेल्या काही दिवसांपासून अधिकच चिघळत चालला आहे. कर्नाटकमध्ये कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते हे बराच धुमाकूळ घालत आहेत. महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोडही त्यांच्याकडून केली जात आहे. असं असताना महाराष्ट्र सरकार अद्यापही संयमाची भूमिका घेताना दिसून येतंय. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील […]
ADVERTISEMENT

Shambhuraj Desai: मुंबई: महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka) यांच्यातील सीमावाद (Border Dispute) चांगलाच उफाळून आला आहे. हा वाद गेल्या काही दिवसांपासून अधिकच चिघळत चालला आहे. कर्नाटकमध्ये कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते हे बराच धुमाकूळ घालत आहेत. महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोडही त्यांच्याकडून केली जात आहे. असं असताना महाराष्ट्र सरकार अद्यापही संयमाची भूमिका घेताना दिसून येतंय. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काही मंत्री हे बेळगावला (Belgaum) जाणार होते. मात्र, अचानक त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला. ज्यावरुन विरोधकांनी त्यांना बरंच टार्गेट केलं. आता याचबाबत राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी नेमकं खरं कारण सांगितलं आहे. (minister shambhuraj desai reveals real reason given for canceling the karnataka tour maharashtra karnataka border dispute)
कर्नाटकमधील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेण्यासाठी महाराष्ट्रातील मंत्री हे काल (6 डिसेंबर) कर्नाटकात जाणार होते. मात्र, त्यांनी हा दौरा अचानक रद्द केला. ज्यामुळे राज्य सरकारवर बरीच टीका झाली. याचबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी आज (7 डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.
‘महापरिनिर्वाण दिनाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही बेळगावमध्ये गेलो नाही. 850 गावातील नागरिकांचं म्हणणं आहे की, आम्हाला महाराष्ट्रात राहायचं आहे’ असं स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी रद्द केलेल्या कर्नाटक दौऱ्याबाबत दिलं आहे.
संजय राऊतांवर टीकेची झोड
दरम्यान, कर्नाटक सीमा प्रकरणी राज्य सरकार ठोस भूमिका घेत नसल्याचं म्हणत संजय राऊतांनी शिंदे सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं. आता राऊतांच्या याच टिकेला शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर देताना टीकेची झोड उठवली आहे. पाहा नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई.