बच्चू कडू कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून डान्स अन् लाडू वाटून जल्लोष का करत आहेत?

मुंबई तक

अमरावती : दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी आमदार बच्चू कडू मागील अनेक वर्षांपासून करत होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची ही मागणी मान्य केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता देताच बच्चू कडू आनंदीत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अमरावती : दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी आमदार बच्चू कडू मागील अनेक वर्षांपासून करत होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची ही मागणी मान्य केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता देताच बच्चू कडू आनंदीत झाले आहेत. हाच आनंद त्यांनी आज अमरावतीच्या संत गाडगेबाबा मंदिरात शेकडो दिव्यांग बांधवांसह साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर अन् एकमेकांना लाडू भरवून त्यांनी जल्लोषात मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाच स्वागत केलं. याशिवाय राज्यभरातील कार्यकर्त्यांनाही त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात जल्लोष साजरा करण्याबाबत सांगितलं होतं.

यावेळी आमदार कडू यांनी कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून भन्नाट असा डान्स केला. तसंच अपंग मंत्रालयाचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर अधिक आनंद होईल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली. शिंदे -फडणवीस सरकारचा हा क्रांतिकारी निर्णय आहे. दिव्यांगाच एक स्वप्न होतं ते स्वप्न अखेर पूर्ण झालं. यासाठी मी अनेक आंदोलनं केली. त्यासाठी गुन्हे दाखल झाले. त्यामुळे दिव्यांग मंत्रालयाचा आनंद आमच्यासाठी मोठा आहे असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे यांचा महत्वाचा निर्णय :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार बच्चू कडू, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.

या बैठकीत शिंदे यांनी दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाच्या प्रस्तावास मान्यात दिली. तसंच तो प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी दिव्यांगांच्या इतर मागण्यांवरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp