Pawar कुटुंब कोणाला कधी समजलं नाही अन् समजणारही…, रोहित पवारांचं कोणाला प्रत्युत्तर?
शिवसेना नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता.
ADVERTISEMENT

Rohit Pawar vs Naresh Mhaske :
“आरोप करणारी व्यक्ती फारशी कोणाला माहित नाही. त्यांना महापौर करताना ते ज्या गटाचे आहेत त्यांच्याच प्रमुखांनी विरोध केला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदत केली होती, अशी आठवण करुन देत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिवसेना (Shiv sena) प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या आरोपांना प्रत्यूत्तर दिलं. आज (शुक्रवारी) पिंपरी चिंचवडमध्ये एका खाजगी कार्यक्रमासाठी आले असताना रोहित पवार बोलत होते. (MLA Rohit Pawar replied to Shiv Sena poke person Naresh Mhaske on Ajit Pawar statement)
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडा, असं सांगण्यासाठी खुद्द अजित पवार अनेकांना फोन करत होते, असं म्हणतं, शिवसेना नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता. रोहित पवार यांना पाडण्यासाठी आपण कोणाकोणाला फोन केले होते? कोणाल निरोप दिले होते? हे आधी सांगा, त्यानंतर आमच्यावर टीका करा, असं म्हस्के म्हणाले होते.
हेही वाचा : नरेंद्र मोदींच्या पदवी प्रकरणात अरविंद केजरीवालांना 25 हजारांचा दणका!
रोहित पवार काय म्हणाले?
म्हस्के यांच्या आरोपांवर बोलताना रोहित पवार म्हणाले, आरोप करणारी व्यक्ती फारशी कोणाला माहित नाही, त्यांना महापौर करताना ते ज्या गटाचे आहेत त्यांच्याच प्रमुखांनी विरोध केला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मदत केली होती. आज-काल नवीन नेत्यांचा ट्रेंड आला आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय आपण मोठे होत नाही, त्यामुळे अशी टीका केली जाते. पण विरोधकांना पवार कुटुंबीय कधी समजलेच नाही आणि समजणार ही नाही, असं त्यांनी म्हटलं.