Exclusive : कोकणात कमळ कसं फुललं? रविंद्र चव्हाणांनी सांगितली रणनीती
Konkan Teacher Constituency Result : मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीचा (Vidhan Parishad Election Result) पहिला निकाल हाती आला आहे. यात भाजपने (BJP) महाविकास आघाडीला (MVA) धक्का दिला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात (Konkan Teacher Constituency) भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिला आहे. (bjp […]
ADVERTISEMENT

Konkan Teacher Constituency Result :
मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीचा (Vidhan Parishad Election Result) पहिला निकाल हाती आला आहे. यात भाजपने (BJP) महाविकास आघाडीला (MVA) धक्का दिला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात (Konkan Teacher Constituency) भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिला आहे. (bjp dnyaneshwar mhatre gave a shock to mva by winning unexpectedly in konkan teacher constituency)
या निवडणुकीत पसंतीक्रम असल्याने त्याचा निकाल कोटा पद्धतीने ठरवला जातो. त्यानुसार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्याच फेरीत पहिल्या पसंतीचा कोटा मिळविल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील आणि महायुतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात थेट लढत होती. यावेळी ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, मतदारांनी ज्ञानेश्वर म्हात्रेंना भरभरून मतदान केल्याने त्यांचा पहिल्या फेरीतच एकतर्फी विजय झाला.
दरम्यान, या निवडणुकीमध्ये भाजपची नेमकी रणनीती काय होती याबाबत जाणून घेण्यासाठी ‘मुंबई तक’ने सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. यावेळी मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नांना चव्हाण यांनी सविस्तर उत्तर दिली.










