India Today conclave mumbai : राष्ट्रवादी कुणाची?, प्रफुल्ल पटेल स्पष्टच बोलले

ADVERTISEMENT

Nationalist congress party who Praful Patel spoke clearly
Nationalist congress party who Praful Patel spoke clearly
social share
google news

Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार (NCP Leader Sharad pawar) आणि अजित पवार (DCM Ajit pawar) असे दोन गट पडले आणि राष्ट्रवादी नेमकी कुणाची हा सवाल उपस्थित केला जाऊ लागला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीमधून बाहेर पडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला असला तरी दोन्हीही गटाकडून राष्ट्रवादी पक्ष आपलाचा असल्याचा दावा केला जातो आहे. इंडिया टुडेच्या मुंबईतील कॉनक्लेव्हमध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (National Working President of NCP Praful Patel) यांनी राष्ट्रवादी कुणाची या प्रश्नावर स्पष्टपणे उत्तर देत वेगळ्याच मुद्याला हात घातला आहे.

राष्ट्रवादीवर दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत आपली वेगळी चूल मांडल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या. कारण विरोधी पक्षनेते पदावर असतानाच त्यांनी राजीनामा देत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीतून फुटून त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांमुळे निर्माण झालेल्या वादावर बोलताना दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस आपलाच पक्ष असल्याचा दावा वारंवार केला गेला.

हे ही वाचा >> शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका तरी आम्ही शिवसेनेसोबत…,पटेलांनी सांगितल खळबळजनक कारण

राष्ट्रवादीचे उत्तर मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेसवर  बोलताना आज प्रफुल्ल पटेले यांनी सांगितले की आता हा वाद निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर हा निकाल लागेल त्यावेळीच राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचे या प्रश्नाचे उत्तर मिळणार असल्याचे त्यांनी सांगितेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भविष्य करणार नाही

प्रफुल्ल पटेल यांनी आज बोलताना राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा यावर ठामपणे न बोलता त्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्ष पुढं घेऊन जात असल्याचेही सांगितले. तर दुसरीकडे शरद पवार यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची हे निवडणूक आयोगाकडूनच निर्णय होईल त्यानंतर त्या प्रश्नाचे उत्तर मिळेल त्यामुळे त्यावर मी आताच भाष्य काही करणार नाही असंही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> NCP : ‘पवार साहेब आदरणीय पण माझे नेते….’, प्रफुल पटेलांचं खळबळजनक विधान

    follow whatsapp

    ADVERTISEMENT