Shiv Sena vs NCP: सुनील तटकरेंचं मोठं विधान, गोगावलेंसाठी ‘गुड न्यूज’; पण..

मुंबई तक

ADVERTISEMENT

ncp ajit pawar group leader sunil tatkare made big statement ncp not insisting for post of guardian minister of raigad district expectations shiv sena mla bharat gogawle increased
ncp ajit pawar group leader sunil tatkare made big statement ncp not insisting for post of guardian minister of raigad district expectations shiv sena mla bharat gogawle increased
social share
google news

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) अचानक अजित पवारांची (Ajit Pawar) एंट्री झाल्याने शिवसेनेतील (Shiv Sena) अनेक आमदारांच्या इच्छा-आकांक्षेवर पाणी फिरलं आहे. त्यातही शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) हे मंत्रिपद आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी (Raigad guardian minister) अत्यंत उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या आमदार आणि नुकत्याच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आदिती तटकरे (Aaditi Tatkare) यांच्या सरकारमधील एंट्रीने गोगावलेंची मात्र चिंता वाढवली आहे. पण या सगळ्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी एक मोठं विधान केलं आहे. जे भरत गोगावलेंसाठी मात्र गुड न्यूज ठरणार आहे. (ncp ajit pawar group leader sunil tatkare made big statement ncp not insisting for post of guardian minister of raigad district expectations shiv sena mla bharat gogawle increased)

2022 साली शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. मात्र, असं असलं तरीही पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना काही स्थान मिळालं नाही. त्यामुळे पालकमंत्री पदाची त्यांची इच्छाही अपूर्णच राहिली. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल या आशेवर असलेले गोगावले हे वर्षभर मंत्रिपदाची वाट पाहत होते. पण असं असताना अचानक राष्ट्रवादीची सरकारमध्ये एंट्री झाली. त्यातही रायगड जिल्ह्याच्याच आदित तटकरेंची थेट कॅबिनेटमध्ये वर्णी लागली. त्यामुळे शिवसेनेच्या गोगावलेंना हवं असलेलं पालकमंत्री पद नेमकं मिळणार तरी कसं? असा सवाल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विचारला जात आहे. अशातच आता सुनील तटकरेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, ‘रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आम्ही कधीही आग्रही नव्हतो. ना काल ना.. आज.’ ज्यामुळे गोगावलेंच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

‘रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आम्ही आग्रही नाही’

सुनील तटकरे म्हणाले की, ‘एकसंघपणाने काम करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी सामूदायिक तत्वावर घेतला आहे. काही वेळेला निर्णय घेण्यांमध्ये काहीसा उशीर होऊ शकतो. परंतु कोणत्याही प्रकारचा समज, गैरसमज मनात न राहता.. स्पष्टपणाची भूमिका घेऊन एका ताकदीने पुढे जाण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार, पालकमंत्री या संदर्भातील निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत झालेला आपल्याला पाहायला मिळेल.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> खोदायला गेला अन् शेतकरी कोट्यधीश झाला, शेतात काय सापडलं?

‘राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यापासून अजितदादा हे दिल्लीला गेलेले नाहीत. तसेच खातेवाटप हा काही तिढा नाही. हा प्रश्न या स्तरावरच सोडवला जाणार आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आम्ही कधीही आग्रही नव्हतो. ना काल ना.. आज शेवटी ज्यावेळेला जेव्हा एकत्रितपणे काम करण्याचं ठरलेलं असतं. त्या वेळेला त्या संदर्भातील जाणीव मनात ठेवून काम करणं अत्यंत आवश्यक असतं. मला असं वाटतं की, या संदर्भातील योग्य तो निर्णय मुख्यमंत्री त्यांच्या स्तरावर घेतील.’ असं म्हणत तटकरेंनी सरकारमध्ये काहीही विसंवाद नाही असं म्हटलं आहे.

पालकमंत्री पदावरुन भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधान?

‘त्यांनी चांगलं काम केलं असेल तर आम्ही काय वाईट काम करणार आहोत?, आम्ही त्याच्यापेक्षा आणखी चांगलं काम करू. कारण महिला आणि पुरूष थोडासा फरक येतो ना.. त्यामध्ये गेल्या 15 वर्षांचा अनुभव आहे आमदारकीचा.. त्यामध्ये बरोबर सगळ्यांना घेऊन काम करू. सहाच्या सहा आमदार आम्ही सगळेजण एकच मागणी आहे की, रायगडचा पालकमंत्री भरतशेटच..’ असं विधान केल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून गोगावलेंविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे.

ADVERTISEMENT

पालकमंत्री पद सोडा, भरत गोगावलेंना मंत्रिपद तरी मिळणार का?

भरत गोगावले हे आक्रमक आमदार म्हणून गेल्या काही दिवसांपासून आपल्या पाहायला मिळत आहेत. शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंवर तुटून पडणाऱ्यांमध्ये गोगावलेंचा क्रमांक हा सगळ्यात वरचा होता. त्यामुळे एवढ्या आक्रमक नेत्याला भाजप नेतृत्व मंत्रिमंडळात सामील करुन घेईल का? अशी जोरदार चर्चा सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> भरत गोगावले आदिती तटकरेंबद्दल असं काय बोलले की रोहित पवार भडकले?

दुसरं कारण म्हणजे.. सध्याच्या मंत्रिमंडळात कोकणातील तीन महत्त्वाचे नेते म्हणजे, उदय सामंत, दीपक केसरकर आणि आदिती तटकरे यांना स्थान आहे. अशावेळी कोकणातील आणखी एका नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल का? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर गोगवलेंचा समावेश करण्यात आला तर एकाच जिल्ह्यात दोन मंत्रिपदं जातील. अशावेळी इतर भागातील आमदार नाराज होण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या शक्यतांचा विचार करुन गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेशच करण्यात आला नाही तर त्यांना पालकमंत्री पद नेमकं कसं दिलं जाणार याच चर्चेने आता राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. त्यामुळे गोगावलेंच्या बाबतीत नेमकं काय होतं हे आपल्याला येत्या काही दिवसातच कळू शकणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT