Andheri Bypoll : भाजपने माघार घेतल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतल्या अंधेरी या ठिकाणी होणारी पोटनिवडणूक ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अशात आजही या निवडणुकीची चर्चा रंगली होती. कारण या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या दिवशी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला. त्याची चांगलीच चर्चा दिवसभर होते आहे. याचबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत शरद पवार?

मी भाजपकडे कुठलीही मागणी केली नव्हती. मी त्यांना कसं काय सुचवू शकतो? काय करायचं तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मी फक्त सल्ला दिला होता. सल्ला दिल्यानंतर काहीतरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे त्यांनी तो घेतला याचा आनंद आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच निर्णय उशिरा घेतला तरीही तो त्यांनी घेतला हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असंही पवारांनी स्पष्ट केलं.

खास शैलीत राज ठाकरेंचा टोला

माझ्या दृष्टीने निर्णय झाला ते महत्त्वाचं आहे. असे निर्णय तातडीने होत नसतात, त्यासाठी चर्चा कराव्या लागतात. अभ्यास करावा लागतो. भाजपने माघार घेतली याचं श्रेय राज ठाकरे यांना देत असल्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की कुणाच्याही कोंबड्याने दिवस उगवला तरीही माझी हरकत नाही. हे म्हणताच एकच हशा पिकला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अंधेरीची पोटनिवडणूक लढत आहेत ऋतुजा लटके

अंधेरी पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी पोटनिवडणूक होत असताना ज्यावेळी सन्मानीय आमदाराचा मृत्यू झालेला असतो आणि त्याच्या घरातल्या व्यक्तीला तिकिट दिलं जातं तेव्हा त्याच्या विरोधात उमेदवार देऊ नये अशी महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे या आशयाचं पत्र राज ठाकरेंनी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं. त्यानंतर आज भाजपने माघार घेतली. याच बाबत विचारलं असता शरद पवार यांनी खास शैलीत टोला लगावला.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर भाजपनं माघार घेण्यचा निर्णय घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत ही भूमिका जाहीर केली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय.

ADVERTISEMENT

रमेश लटकेंच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. ही निवडणूक लढवण्याची भूमिका भाजपनं सुरुवातीला घेतली होती. भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर निवडणुकीला वेगळं वळण मिळालं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT