महिला, कमिशन, संपत्ती... : आमदार अमोल मिटकरींविरुद्ध गंभीर आरोपांची माळ

अन्यथा दहा दिवसांनंतर सर्व पुरावे माध्यमांसमोर उघड करणार...
Amol Mitakri
Amol Mitakri Mumbai Tak

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्याविरोधात उठलेले आरोपांचे वादळ शमताना दिसून येत नाही. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी आज पुन्हा एकदा आमदार मिटकरी यांच्याविरोधात महिलेचे प्रकरण, कमिशनखोरी आणि बेनामी संपत्ती असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. मोहोड यांनी 'मुंबई तक'कडे मिटकरी यांच्यासोबतचे व्हॉट्सअॅपचे कथित चॅट शेअर केले आहेत. या चॅटबाबत 'मुंबई तक'ने खात्री केलेली नाही.

आमदार मिटकरी यांच्यावर गंभीर आरोप :

अमोल मिटकरी यांनी अकोला जिल्ह्यातील पातूरच्या एका महिलेचे प्रकरण मिटविण्यात आले आहे. या प्रकरणात पाया पडणाऱ्या मिटकरी यांचे व्हिडीओही आपल्याकडे आहेत. आपल्यावर चारित्र्याचे आरोप करणाऱ्या मिटकरींनी त्याचे पुरावे द्यावेत, अन्यथा दहा दिवसांनंतर सर्व पुरावे आपण माध्यमांसमोर उघड करणार, असे आव्हान मोहोड यांनी दिले आहे. तसेच मिटकरी यांनी आपल्या चारित्र्यावर केलेले आरोप सिद्ध झाले तर भरचौकात फाशी घेईल, असेही मोहोड यांनी म्हटले आहे.

Amol Mitakri
कल्याणच्या 'मी शिवसेना बोलतेय' देखावा साकारणाऱ्या विजय तरूण मित्रमंडळाची कोर्टात धाव

मिटकरी यांनी एका महिलेच्या संदर्भातील प्रकरण अकोल्यातील एका महिला पदाधिकाऱ्याला 10 लाख रूपये देऊन मिटवले, असा आरोपही मोहोड यांनी केला आहे. याशिवाय मिटकरी यांनी तीन दिवस अकोल्याच्या विश्रामगृहावर ठेवलेली पुण्यातील पदाधिकारी कोण होती? असा सवालही विचारला आहे.

अमोल मिटकरी यांनी कमिशन घेतल्याचे आरोप :

मोहोड यांनी नुकतेच आमदार मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप केला होता. अकोल्यातील पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच मोहोड यांनी मिटकरींविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला होता. 2 लाख रुपये घेवून त्यांना 20 लाखांचा निधी दिला, असा आरोप करण्यात आला होता.

Amol Mitakri
एकनाथ खडसेंना घेरण्याची खेळी फसली?, शिंदे-फडणवीस सरकारला न्यायालयाकडून झटका

त्यानंतर आता मोहोड यांनी 'मुंबई तक'कडे एक वॉट्सअॅप चॅट उघड केले आहे. यात मिटकरी यांनी कमिशनचे 1 लाख परत केल्याचा दावा मोहोड यांनी केला आहे. याशिवाय मिटकरी यांनी केशवनगरमध्ये 80 लाख रुपयांना खरेदी केलेल्या भुखंडाचा स्त्रोत काय आहे? सोबतच 30 लाख रुपयांची चारचाकी गाडी कुठून घेतली? असेही अनेक सवाल त्यांनी विचारले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in