Mahesh Tapase: ”ज्या पक्षाकडे एक आमदार आहे तो पक्ष 40 आमदारांचा मालक होणार का?”
मिथीलेश गुप्ता मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी खोचक टोला लगावला आहे. तपासे यांनी बोलताना शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केले. हे आमदार कुठल्या पक्षात जातील याबाबत उत्सुकता आहे. ते आमदार भाजपमध्ये जातील असे बोलले जात […]
ADVERTISEMENT

मिथीलेश गुप्ता
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी खोचक टोला लगावला आहे. तपासे यांनी बोलताना शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केले. हे आमदार कुठल्या पक्षात जातील याबाबत उत्सुकता आहे. ते आमदार भाजपमध्ये जातील असे बोलले जात होते.
ते भाजपमध्ये जाण्यास तयार नाही. ते प्रहारमध्ये जातील. तशीही परिस्थिती नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा देणारे 40 आमदार कुठल्या गटाचे आणि पक्षाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सरकार किती वैध किती अवैध आहे हे स्पष्ट होणार आहे.
४० आमदारांचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हा प्रश्न घेवून राज ठाकरेंकडे गेले का, असा प्रश्न निर्माण होतोय, मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भेट घेतली. या भेटीपश्चात ज्या पक्षाकडे एक आमदार आहे,तो पक्ष एका रात्रीत 40 आमदारांचा मालक होईल का अशी उलट सुलट चर्चा आहे असे प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे. पुढे बोलताना ठाकरे आणि फडवणीसमध्ये नेमकी काय चर्चा झाली ही माहिती समोर आलेली नसल्याने बंडखोर गट मनसेत जाणार का ही चर्चा सध्या असल्याचे त्यांनी सांगितले.