खासदार श्रीकांत शिंदे Super CM झाल्याबद्दल शुभेच्छा! तो फोटो ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला

मुंबई तक

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार आल्यापासूनच महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे फडणवीस सरकार असा सामना रंगताना दिसतो आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केलेला एक फोटो चर्चेत आहे. या फोटोनंतर राष्ट्रवादीने श्रीकांत शिंदेंचं सुपर सीएम झाल्याबद्दल अभिनंदनही केलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार आल्यापासूनच महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे फडणवीस सरकार असा सामना रंगताना दिसतो आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केलेला एक फोटो चर्चेत आहे. या फोटोनंतर राष्ट्रवादीने श्रीकांत शिंदेंचं सुपर सीएम झाल्याबद्दल अभिनंदनही केलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला असून त्यावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे. रविकांत वरपे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना हा फोटा अतिशय जबाबदार व्यक्तीने मला पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला हा फोटो आहे. तिथे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. अशा ठिकाणी त्यांचे सुपुत्र बसले आहेत. असं दिसतं आहे. यावरून आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

काय आहे रविकांत वरपे यांचं ट्विट?

खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर?

काय आहे या फोटोत?

रविकांत वरपे यांनी जो फोटो ट्विट केला आहे त्यामध्ये श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसल्याचं दिसून येतं आहे. महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असा फलकही त्यामागे आहे. तसंच या फलकाच्या वर बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही आहे. या खुर्चीत बसून श्रीकांत शिंदे लोकांशी चर्चा करत आहेत असं दिसतं आहे. हा फोटो मला अत्यंत विश्वासू माणसाने पाठवला आहे असंही रविकांत वरपे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर या फोटोची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. या फोटोवर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी २१ जूनला बंड केलं. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे पहिल्यापासूनच त्यांच्यासोबत आहेत. हे सगळं बंड झाल्यानंतर आणि शिंदे फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर शिवसेनेतले १२ खासदारही शिंदे गटात आले आहेत. या सगळ्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. या फोटोवरून राजकारण रंगण्याची चिन्हं आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp