नितीश कुमारांच्या राजकारणाचा असा आहे पॅटर्न! २२ वर्षांचा राजकीय इतिहास काय सांगतो?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपशी युती तोडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लवकरच नितीश कुमार याबाबतची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि जेडीयूची सध्या बिहार राज्यावर सत्ता आहे. नितीश कुमार भाजपशी युती तोडत आरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्षांसोबत मिळून सरकार बनवणार असल्याची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप पाहण्यास मिळणार ही चर्चा आहे.

काय आहे सध्याचं बिहारचं पक्षीय बलाबल?

२०२० साली झालेल्या निवडणुकीत भाजप आणि नितीश कुमारांची जेडीयू एकत्र लढले होते. तर काँग्रेस आणि आरजेडी यांची आघाडी होती. एकूण २४३ जागा असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक ७९ जागा आरजेडीने जिंकल्या होत्या. भाजपला ७७, जेडीयूला ४५, काँग्रेसला १९ तर डावे पक्षांना १६ जागा जिंकता आल्या होत्या. नितीश कुमारांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्या असताना देखील भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले होते. मात्र, मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि जेडीयूमध्ये ऑल इज नॉट वेल नाही हेच दिसून येत आहे. त्यामुळे नितीश कुमार आरजेडी, काँग्रेस, आणि डाव्या पक्षांसोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यामुळे जर हे पक्ष एकत्र आले तर त्यांना बहुमताच्या आकड्यापर्यंत सहज पोहचता येईल.

लोकसभा निवडणुकीच्याआदी सत्तेतून बाहेर पडण्याचा नितीश कुमारांचा इतिहास

नितीश कुमारांनी अनेकदा भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. तर अनेकदा लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नितीश कुमार असे पाऊल उचलतात, असेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहिल्यास लक्षात येतं. २०१४ च्या निवडणुकीच्या आगोदर भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फक्त दोनच जागा जिंकता आल्या. या पराभवाची जबाबदारी घेत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर पुन्हा नितीश कुमार यांनी २०१७ साली भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली होती. त्यादरम्यान देखील २०१९ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या होत्या. त्यावेळी आरजेडी आणि काँग्रेससोबत महाआघाडी तोडत त्यांनी भाजपशी युती केली होती. तर आता पुन्हा ते भाजपसोबतची युती तोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यावेळी देखील २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.

मागील २२ वर्षात ७ वेळा नितीश कुमार मुख्यमंत्री, ६वेळेस भाजप होती सोबत

नितीश कुमार हे बिहार राज्यातील महत्वाचे नेते मानले जातात. आतापर्यंत ते मागच्या २२ वर्षात ७ वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यापैकी ६ वेळा ते मुख्यमंत्री असताना भाजपसोबत त्यांची युती राहिली आहे. २००० साली नितीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यादरम्यान जेडीयू आणि भापजला मिळून १५१ जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमतासाठी १६३ जागा गरजेचे होत्या. त्यामुळे बहुमत सिद्ध होत नसल्याने नितीश कुमार यांनी ७ दिवसात आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

ADVERTISEMENT

२००५ साली भाजपसोबत युतीत त्यांनी बिहार विधानसभेत बहुमत मिळवून सत्ता मिळवली. २०१० साली बिहारच्या जनतेने पुन्हा नितीश कुमार यांना बहुमत दिले. पुन्हा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला फक्त दोन जागा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि जीतन राम मांझी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं. मात्र, मांझींनी नितीश यांच्यासोबत खटके उडाल्याने २०१५ साली राजीनामा दिला होता. त्यानंतर अल्पकाळासाठी नितीश कुमार हे पुन्हा चौथ्या वेळेस मुख्यमंत्री बनले.

ADVERTISEMENT

२०१५ साली एनडीएतून बाहेर पडत नितीश कुमार यांनी आरजेडी, काँग्रेससोबत निवडणूक लढवत बहुमत मिळवले आणि पुन्हा पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र अचानक २०१७ साली दोन वर्षातच नैतिकतेचं कारण सांगून त्यांनी पुन्हा राजीनामा दिला. आणि भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन करत सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपसोबत निवडणूक लढवत बहुमत सिद्ध केले. भाजपपेक्षा कमी जागा मिळून सुद्धा ते बिहारचे सातव्यांदा मुख्यमंत्री झाले. आता पुढे काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT