‘आता पुढची मुलाखत जेलमध्ये जेलरची घ्या,’ निलेश राणेंची संजय राऊतांवर खोचक टीका

मुंबई तक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सध्या त्यांच्या ईडीच्या पथकाकडून चौकशी सुरु आहे. सकाळी सात वाजल्यापासून ईडी संजय राऊत यांची चौकशी करत आहे. पत्रा चाळप्रकरणी संजय राऊत यांची चौकशी सुरु असल्याचं बोललं जात आहे. याकारवाईबाबात विविध स्तरावरुन प्रतिक्रिया येत आहेत. सकाळी एकेकाळी सहकारी असलेले रामदास कदम यांनी संजय राऊतांवर टीका केली होती. आता भाजपचे प्रदेश चिटणीस […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सध्या त्यांच्या ईडीच्या पथकाकडून चौकशी सुरु आहे. सकाळी सात वाजल्यापासून ईडी संजय राऊत यांची चौकशी करत आहे. पत्रा चाळप्रकरणी संजय राऊत यांची चौकशी सुरु असल्याचं बोललं जात आहे. याकारवाईबाबात विविध स्तरावरुन प्रतिक्रिया येत आहेत. सकाळी एकेकाळी सहकारी असलेले रामदास कदम यांनी संजय राऊतांवर टीका केली होती. आता भाजपचे प्रदेश चिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. संजय राऊत यांनी यापुढे आता जेलमध्ये जेलरची मुलाखत घ्यावी, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे उरलेला नाही, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी राऊतांवर केली आहे.

निलेश राणेंचा राऊतांवर घणाघात

शिवसेनेवर नेहमी प्रखर टीका करताना राऊत कुटुंबीय आघाडीवर असतात. मग ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असो अथवा आदित्य ठाकरे. आता राणेंच्या निशाण्यावर संजय राऊत आहे. संजय राऊत यांच्यावर सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना निलेश राणेंनी संजय राऊतांवर टीका करताना म्हणाले, पत्रा चाळ हा जवळपास १२०० कोटींचा घोटाळा आहे. त्यात संजय राऊत पार्टी आहेत. पण संजय राऊत ईडीच्या चौकशीला सहकार्य करत नसल्याने अधिकारी घरी पोहचले. जर इतका मोठा घोटाळा झाला असेल तर संजय राऊतांना उत्तरे द्यावी लागणार, असं निलेश राणे म्हणाले.

खोचक टीका करत निलेश राणे म्हणाले, ”संजय राऊतांच्या नावाने काय ब्रिटीशांनी प्रमाणपत्र सोडून गेलेत का? की हा आमचा बाब्या आहे. याच्यावर कसलीही कारवाई होता कामा नये, अश्लिल चाळे केले तरी चालतील, महिलांना शिव्या दिल्या तरी चालेल, असा काही प्रमाणपत्र घेऊन आलेत का संजय राऊत, असा सवाल निलेश राणेंनी केला. घरात कारवाई सुरु असताना घराबाहेर शिवसैनिक जमून ईडीच्या विरोधात घोषणा देत आहेत. यावर बोलताना निलेश राणे म्हणाले, संजय राऊतांनी जी भाड्याची लोकं घराबाहेर घोषणा द्यायला उभी केलीत त्यांच्यावर पोलीसांचे बांबू पडल्यास एकही संजय राऊतांचं नाव संध्याकाळी घेणार नाही, असं निलेश राणे म्हणाले.

संजय राऊतांनी जास्त नाटकं करु नका, जी चौकशी होतीय त्याला सहकार्य करा, तरच तुम्हाला याच्यातून मार्ग निघू शकतो, असं राणे म्हणाले. उगाच धुमाकुळ घालायचा प्रयत्न केला तर जेलमध्ये बसून जेलरची मुलाखत घेण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय उरणार नाही, असा देखील टोला निलेश राणेंनी लगावला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp