Navy Day 2023: PM मोदींच्या सिंधुदुर्गाच्या किनारी मोठ्या घोषणा, आता शिवरायांची राजमुद्रा…
नौदल दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोकण दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी नौदलाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवत त्यांनी नौदलासाठी आज दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची महत्ता साऱ्या जगात आहे. त्यामुळेच आता त्यांची राजमुद्रा नौदलाच्या गणवेशावर असणार आहे.

PM Narendra Modi : नौदल दिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोकण (Konkan) दौऱ्यावर होते. कोकणच्या दौऱ्यावर असतानाच आणि नौदल दिनानिमित्त (Navy Day) पंतप्रधान मोदी यांनी आज दोन मोठ्या घोषणा केल्या. कोकणातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले. या पुतळ्याचे अनावरण करताना नरेंद्र मोदी यांनी, ‘छत्रपती वीर शिवाजी महाराज की जय, छत्रपती वीर संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत त्यांनी शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याविषयी गौरवोद्गगार काढले.
छत्रपतींची राजमुद्रा गणवेशावर
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर नौदलाने त्यांच्यासमोर वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवून नौदलाच्या कार्याची ओळख करून दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी बोलताना सांगितले की, आता यापुढे नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणार आहे. तसेत भारतीय नौदलातील पदांची नावंही आता भारतीय परंपरेनुसार देणार असल्याची घोषणाही नरेंद्र मोदी यांनी केली. या दोन घोषणांमुळे आता नौदलातील गणवेशात बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा >> मापात पाप! पेट्रोल पंपावर असंही फसवू शकतात, इथे ठेवा लक्ष
नौदलाचेही अभिनंदन
नरेंद्र मोदी यांनी नौदलाविषयी महत्वाच्या दोन घोषणा केल्यानंतर त्यांनी नौदलाचेही अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले की, आम्ही सशस्त्र दलांमध्ये महिलांची शक्ती वाढवण्यावर भर देत आहोत. त्यामुळेच नौदलाचेही आम्ही यासाठी अभिनंदन करतो की, नौदलाने पहिल्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे ही गोष्टही महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपतींचे शौर्य आणि ध्येय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचे कौतुक करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याच्या ओळख करून देत त्यांनी कोकणातील किल्ल्यांचेही महत्व अधोरेखित केले. कोकणातील गडकोट किल्ल्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याविषयी, त्यांच्या ध्येयधोरणांची महत्ती जगभर गेली आहे. त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या शौर्याचा परंपरा आणि वारसा आपल्याला लाभल्यामुळेच नौदलाही वेगळे महत्व प्राप्त झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या कार्याचे आपल्याला नेहमीच स्मरण व्हावे यासाठी आम्ही आज दोन मोठ्या घोषणा केल्याचेही त्यांनी सांगितले.