Omraje Nimbalkar : याचं बाळानं त्याच्या बापाला अन् त्याला बाळं काय आहे ते दाखवून दिलयं...

'बाळा'वरुन उस्मानाबादचं राजकारण तापलं....
Rana jagjitsingh patil - Omraje nimbalkar
Rana jagjitsingh patil - Omraje nimbalkar Mumbai Tak

उस्मानाबाद : बाळा, बाळा... पण याचं बाळानं त्याच्या बापाला अन् त्याला लोकशाहीच्या माध्यमातून बाळं काय आहे ते दाखवलं आहे, असं म्हणतं ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप खासदार राणा जगजितसिंह पाटील यांना प्रत्युत्तर दिलं. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर बोलत होते.

उस्मानाबादमधील निंबाळकर-पाटील घराण्यातील जुना वाद आज (शनिवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा एकदा उफाळून आला. ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयातच एकमेकांना भिडले. दोघांमध्येही टोकाचा शाब्दिक वाद पाहायला मिळाला. याच वादानंतर बोलताना राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर  संस्कार नाहीत, त्यांची लायकी नाही, असं म्हणतं निशाणा साधला.

ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

यावर बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, आजची बैठक फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांची होती. तरीही राणा पाटलांनी विनाकारण शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने "तुम्ही तुमचे तक्रारी अर्ज घेऊन या, आपण अशी अशी बैठक लावली आहे" असं आवाहन केलं. त्यामुळे बिचारे शेतकरी सगळा काम-धंदा सोडून जिल्हाधिकारी ऑफिसवर आले.

त्यावेळी जमा झालेल्या शेतकऱ्यांनी अशी चर्चा चालू केली की बैठक आहे मग खासदार कुठे आहेत? विरोधी पक्षाचा आमदार कुठे आहे? अशी चर्चा चालू झाल्यानंतर मी स्वतःहून इथं आलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, की बैठक होती का? होती तर मग फक्त सत्ताधारी लोकांनाच बोलवलं का? विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधींना बोलावलं नाही असं आहे का? जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट सांगितलं की कुठल्याही लोकप्रतिनिधिला निमंत्रित केलेलं नव्हतं. ही फक्त बैठक अधिकाऱ्यांची आहे.

Rana jagjitsingh patil - Omraje nimbalkar
ओमराजे निंबाळकरांनी औकात काढली; राणा जगजितसिंह पाटलांनी लायकी सांगत दिलं प्रत्युत्तर

केंद्र सरकारचीही विमा कंपनी शेतकऱ्यांची हेळसांड करतीय...

दुसरा मुद्दा म्हणजे, याचं शहाण्या आमदारानं सांगितलं दुसरं की तुम्ही प्रशासनाकडे अर्ज करा आणि तुमचं जे पंचनामा झाले त्याची कॉपी घ्या. मी प्रशासनाला तुमच्या समोर विचारलं की प्रशासनाकडे पंचनामे झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या कॉपी आहे का? प्रशासनाने स्पष्ट सांगितलं की प्रशासनाकडे यातील कुठलीही कॉपी नाही.

एक तर त्या शेतकऱ्यावर अन्याय केला, आम्ही कालपर्यंत खाजगी विमा कंपनी बाबतीत बोलत होतो, पण आता केंद्र सरकारची विमा कंपनीही शेतकऱ्याची अशा पद्धतीने हेळसांड करत आहे. बांधा शेजारी बांध असलेल्या एकाला पाचशे रुपये दिले तर एकाला पन्नास हजार रुपये दिले. माझं मत आहे, तुम्ही या सगळ्या याद्या ग्रामपंचायतमध्ये लावा आणि सोशल ऑडिट करा. सर्वांना योग्य मदत द्या.

Rana jagjitsingh patil - Omraje nimbalkar
ओमराजे निंबाळकरांची सटकली; "तु तुझ्या औकातीत रहा" म्हणतं राणा जगजितसिंह पाटलांना भिडले

याच बाळानं दोघांनीही दाखवून दिलयं...

हे चालू असताना त्यांनी विनाकारण तोंड खुपसलं. ते म्हणाले, बाळा, बाळा... पण याचं बाळानं त्याच्या बापाला अन् त्याला दोघांनाही लोकशाहीच्या माध्यमातून बाळ काय आहे ते दाखवलं आहे. मी त्याला एवढंच म्हणलं की तुम्ही तुमच्या औकातीत राहा, तुमचे संस्कार आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे तुम्ही त्या बाकीच्या भानगडी पडू नका. कारण मी तुम्हाला बोललोच नव्हतो. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतोय.

राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या सख्ख्या चुलत भावाची सुपारी देऊन हत्या घडवून आणतात, हे त्या लोकांवर संस्कार आहेत का माझ्यावर आहेत, त्यांच्या बापावर आणि यांच्यावर कसे संस्कार आहेत हे सगळ्यांना माहित आहे.

श्रीमंत खासदारांच्या यादीत ३ नंबरला...

हा जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत ३ नंबरला आहे. ज्या जिल्ह्यात ४० वर्ष आमदार आणि खासदार हे होते त्या जिल्ह्याची अवस्था मागास जिल्ह्याच्या यादीत ३ नंबरला. त्याचवेळी श्रीमंत खासदारांच्या यादीतही हेच ३ नंबरला होते. यावरून लक्षात येते की कुणाचा विकास झाला आणि कुणाचं शोषण झाले. त्यामुळे ह्यांच्या संस्काराबद्दल बोलायची आवश्यकता नाही. त्यांचे संस्कार पूर्ण जिल्हा पूर्ण राज्य आणि पूर्ण देश बघत आहे. त्यामुळे त्याच्यावर मला फारसं बोलायचं नाही.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in