निवडणूक गुजरातची, सुट्टी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये : शिंदे सरकारने काढला आदेश
मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. भाजप, काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. भारत जोडो यात्रेवर असलेल्या राहुल गांधींचीही गुजरातच्या प्रचारात सोमवारी एंट्री झाली. प्रशासनचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच महाराष्ट्रात शिंदे सरकारचा गुजरात निवडणुकीसंदर्भातला एक निर्णय खूप चर्चेत आहे. गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचा […]
ADVERTISEMENT

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. भाजप, काँग्रेससह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. भारत जोडो यात्रेवर असलेल्या राहुल गांधींचीही गुजरातच्या प्रचारात सोमवारी एंट्री झाली. प्रशासनचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
अशातच महाराष्ट्रात शिंदे सरकारचा गुजरात निवडणुकीसंदर्भातला एक निर्णय खूप चर्चेत आहे. गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला.
काय आहे या आदेशामध्ये?
या निर्णयानुसार, महाराष्ट्रात राहणाऱ्या मतदारांना गुजरात निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावता यावा म्हणून ही सुट्टी देण्यात आली आहे. चार जिल्ह्यांतल्या मतदारांना भर पगारी ही सुट्टी देण्यात येणार आहे. यामध्ये पालघर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार या गुजरात सीमेवरील जिल्ह्यांचा समावेश आहे.
हा सुट्टी आदेश उद्योग, ऊर्जा, कामगार विभागांतर्गत येणारे सर्व उद्योगसमूह, महामंडळे, कंपन्या आणि संस्था तसंच औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांमध्ये लागू असणार आहे. तसंच अपवादात्मक स्थितीतील कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातल्या कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देण्यात यावी.