Nana Patole: ''आमच्या आमदारांना धमक्या येत आहेत, सर्व रेकॉर्डिंग लवकरच बाहेर काढू''

Nana Patole: राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषद निवडणुकीचं (Legislative Council elections) वारं वाहत आहे. येत्या २० तारखेला १० जागांसाठी मतदान होणार आहे.
Nana Patole: ''आमच्या आमदारांना धमक्या येत आहेत, सर्व रेकॉर्डिंग लवकरच बाहेर काढू''
Nana Patole(फाइल फोटो)

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषद निवडणुकीचं वारं वाहत आहे. येत्या २० तारखेला १० जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात मताची जुळवाजुळव सुरु आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याच विधान परिषद निवडणुकीवरुन विरोधकांवरती गंभीर आरोप केले आहेत. विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. आमच्या आमदारांना धमकावले जात आहे. महाविकास आघाडीतील आमदारा फोन करुन धमकावले जात आहे, त्याची सर्व माहिती आमच्याकडे आहे ती योग्यवेळी बाहेर काढू असे नाना पटोले म्हणाले आहेत.

नाना पटोले (Nana Patole) यावेळी बोलताना म्हणाले की "विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणनीती ठरलेली आहे. राज्यसभा निवडणुकीत आमच्या आणि विरोधकांच्या मतांचे अंतर कमी होते या निवडणुकीत ते जास्त आहे. अपक्ष आणि आमच्या सोबत असलेले इतर पक्ष आम्हालाच मदत करतील," असे पटोले म्हणाले. "विरोधकांना २२ मतं हवी आहेत तर आम्हाला १० मतं हवी आहेत एवढी मतं त्यांना मिळणार नाहीत त्यामुळे आमचे उमेदवार निवडूण येतील असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, आमदारांना पैशांचे प्रलोभन दाखवणे याचा उपयोग भाजपला होणार नाही. तपास यंत्रणा काही आमदारांना फोन करुन धमकावत आहेत, दबाव टाकत आहेत. या सर्व गोष्टींचे रेकॉर्डींग आमच्याकडे आहे असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

"आम्हाला मतदान करा, नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, अशा धमक्या आमच्या आमदारांना आलेल्या आहेत. ही परिस्थिती लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. भाजपने किती त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विधान परिषदेवर निवडून येतील असे पटोले म्हणाले आहेत.

विधान परिषदेला उभे असलेले उमेदवार

भाजप

उमा खापरे, प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड

शिवसेना

आमश्या पाडवी, सचिन अहिर

राष्ट्रवादी काँग्रेस

रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे

काँग्रेस

चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in