पंकजा मुंडे बीडच्या पालकमंत्री होणार? खासदार प्रीतम मुंडेंनी दिले संकेत

मुंबई तक

बीड : बीडच्या पालकमंत्री म्हणून लवकरच पंकजा मुंडे यांचे पुनरागमन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईमध्ये कार्यक्रमात खासदार प्रीतम मुंडे यांनी केलेल्या एका विधानानंतर आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छानंतर याबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली. केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बीड : बीडच्या पालकमंत्री म्हणून लवकरच पंकजा मुंडे यांचे पुनरागमन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईमध्ये कार्यक्रमात खासदार प्रीतम मुंडे यांनी केलेल्या एका विधानानंतर आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छानंतर याबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली. केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंकजा मुंडे यांची उपस्थिती होती.

काय म्हणाल्या प्रीतम मुंडे?

अंबाजोगाई शहर हे कदाचित काही वर्षांपूर्वी जसे होते त्यापेक्षा अधिक चांगलं बनविण्याचा प्रयत्न पंकजाताई पालकमंत्री असताना झाले. पुढच्याही काळात हे काम असचं करतं राहू. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते लवकरच तुम्ही बीडच्या पालकमंत्री लाभावं आणि जो काही कमी-जास्त बॅकलॉग आहे तो भरुन काढावा, अशा शुभेच्छा देत बीडच्या पालकमंत्रीपदी पंकजा मुंडे यांचे पुनरागमन होणार असल्याचे संकेत प्रीतम मुंडे दिले. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांची राज मंत्रिमंडळात वर्णी लागणार हे भाजपच्या गोटात निश्चित झालं आहे का असा सवाल विचारला जात आहे.

पावणे तीन महिन्यांनंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्हे

सरकार स्थापनेनंतर तब्बल पावणेतीन महिन्यानंतर तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नुकतीच सहकार मंत्री अतुल सावे यांची निवड झालेली असून सावे हे जालना आणि बीडचे पालकमंत्री आहेत.

कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री?

  • राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर

हे वाचलं का?

    follow whatsapp