NCP: दादा की ताई...? 'चावडी'वर गोंधळलेल्या प्रफुल पटेलांचा दोन आठवड्यातच मोठा प्रताप! - Mumbai Tak - praful patel ajitdada or supriyatai mumbai tak chavadi within two weeks left sharad pawar announced support to ajit pawar political news maharashtra - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

NCP: दादा की ताई…? ‘चावडी’वर गोंधळलेल्या प्रफुल पटेलांचा दोन आठवड्यातच मोठा प्रताप!

भविष्यात अजितदादा की सुप्रियाताई यापैकी कोणाची निवड करणारा या प्रश्नाला मुंबई Tak चावडीवर देताना प्रफुल पटेल काहीसे गोंधळले होते. मात्र, त्यानंतर दोनच आठवड्यात त्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांना आपला पाठिंबा जाहीर केला.
praful patel ajitdada or supriyatai mumbai tak chavadi within two weeks left sharad pawar announced support to ajit pawar political news maharashtra

Maharashtra Politics News Live: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) आज घडीला मोठी फूट पडली आहे. कारण पक्षाचे दिग्गज नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. खरं तर अजित पवार हे भाजपच्या (BJP) सोबत जाणार याबाबत कुणकुण होती. मात्र, त्यांच्यासोबत पक्षाचे कार्याध्यक्ष असलेले प्रफुल पटेल (Praful Patel) हे देखील भाजपसोबत गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कार्याध्यक्ष झाल्यानंतर प्रफुल पटेल हे मुंबई Tak च्या ‘चावडी’वर (Mumbai Tak Chavadi) आले होते. यावेळी त्यांना भविष्यात दादा की ताई? असा सवाल विचारण्यात आला होता. ज्यावर उत्तर देताना प्रफुल पटेल हे काहीसे गोंधळलेले दिसून आले होते. मात्र, चावडीवर येऊन दोन आठवडे होत नाही तोच प्रफुल पटेलांनी पवारांसह संपूर्ण पक्षाला हादरा देणारा असा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं. (praful patel ajitdada or supriyatai mumbai tak chavadi within two weeks left sharad pawar announced support to ajit pawar political news maharashtra)

दादा की ताई..?, पाहा प्रफुल पटेल चावडीवर नेमकं काय म्हणालेले

प्रश्न: भविष्यात असा सवाल येऊ शकतो की, दादा की ताई? अशावेळी प्रफुल पटेल हे कोणाला निवडणार?

प्रफुल पटेल: असं आहे की.. मी माझ्या पक्षात जबाबदार व्यक्ती आहे असं समजूनच काम करतो. मी सुरुवातीला काय म्हटलं की, हा पक्ष माझा आहे.. कोणी जबाबदारी दिली तरच मी माझी जबाबदारी पार पाडायची का? असं थोडी असतं… मला जोपर्यंत असं वाटतं की, माझ्या पक्षामध्ये माझी गरज आहे.. मला काम करण्याची संधी आहे.. तर मग मी माझ्या पक्षासाठी का काम करणार नाही?

हे ही वाचा>> “अजित पवारांचं बंड शरद पवारांना कळलं होतं एक दिवस आधीच”, बंडाची Inside Story

कोणी मला सांगितलं तरच मी काम करेन का? दुसरी गोष्ट तुम्ही हे म्हटलं की, हे की ते.. आता त्या जर-तरच्या प्रश्नांना जर-तर मध्ये उत्तर देणं काही योग्य नाही.. मी माझ्या पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी आहे. सुप्रिया सुळे असो.. अजित पवार असू किंवा इतर कोणी आमचे जयंत पाटील पासून छगन भुजबळ.. किंवा इतर जे कोणी आमचे महत्त्वाचे नेते किंवा प्रमुख मंडळी आहेत त्यांना सगळ्यांच्या सोबत एकत्र काम एकमेकांनी करावं ही महत्त्वाची बाब आहे. आता पुढच्या नंतर काय होईल.. कोणाबरोबर कोण पसंती देईल.. कोणाची पसंती राहील.. हे माझ्या मते महत्त्वाचं नाही.

प्रश्न: उत्तराधिकारी निवडण्याचा प्लॅन आता स्पष्ट आहे ना?, सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष झाल्या म्हणजे प्लॅन क्लिअर आहे ना?

प्रफुल पटेल: उत्तराधिकारी निवडण्याचा प्लॅन काय क्लिअर आहे? मी पण आहे ना कार्याध्यक्ष.. म्हणजे असं कसं.. म्हणजे मी काय फिलर (फक्त जागा भरण्यापुरता) आहे का?

असं काहीसं संभ्रम निर्माण करणारं उत्तर हे प्रफुल पटेल यांनी दिलं होतं. मी काही जर-तर मध्ये उत्तर देत नाही. सगळ्यांनी सगळ्यांसोबत काम केलं पाहिजे असं विधान प्रफुल पटेलांनी चावडीवर केलं होतं. मात्र, अवघ्या दोनच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जात पटेलांनी अजित पवारांना साथ दिली.

‘साहेबांशी माझे संबंध कसे हे कळायला अजित पवारांना देखील खूप वर्ष लागतील’

दरम्यान, चावडीवरच बोलताना प्रफुल पटेल म्हणाले होते की, त्यांचे शरद पवार यांच्याशी अत्यंत गाढ संबंध आहेत आणि ते कळायला अजित पवारांना देखील त्यांना खूप वर्ष लागतील.

पाहा प्रफुल पटेल नेमकं काय म्हणालेले:

‘अजित पवार आणि माझे चांगले संबंध असणं काही चुकीचं आहे? माझे आणि शरद पवार साहेबांचे संबंध किती गाढ आहे हे अजून अजित पवारांना कळायला देखील खूप वर्ष लागतील. माझं एक वैशिष्ठ आहे की, माझे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. इतर पक्षांमध्येही चांगले संबंध आहेत.’

हे ही वाचा>> NCP: अजितदादांसोबत गेले अन् कार्यक्रमच, राष्ट्रवादीकडून 3 नेत्यांची हकालपट्टी!

‘राजकारण हा काही माझा धंदा नाही. ती माझी आवड आहे. लोकांची सेवा करायची म्हणून मी राजकारणात आहे. माझी स्टाइल एक वेगळी आहे. मला इतरांचं सारखं पटत नाही. इतर पक्षातील लोकांसोबत माझी मैत्री आहे. म्हणून माझ्या पक्षातील सर्वांसोबत.. म्हणजे मी कुठल्या गटातला वैगरे नाही. म्हणून तर शरद पवार साहेबांनी माझ्यासारख्या एवढे वर्ष विश्वास दाखवला, जबाबदाऱ्या दिल्या.’ असं प्रफुल पटेल यावेळी म्हणाले.

 

अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट? राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला… मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन! Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय? आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना… Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘या’ रस्त्यांवरून जाणं टाळाच भारतीय क्रिकेटर तापाने फणफणले! रोहित शर्मा म्हणाला.. 10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ? लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण… ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल… ओठांच्या आकारावरून समजते पर्सनॅलिटी, तुमची कशी आहे ओळखा? रिकाम्या पोटी गोड पदार्थांचं सेवन टाळा! नाहीतर… दारूचा ‘पेग’ कसा आला? काय आहे अर्थ? भारतीय क्रिकेटरला ‘देवी’ म्हणत चिनी फॅन पोहोचला 1300 किमी दूर!