Narendra Modi : आधी घोटाळ्यांच्या बातम्या असायच्या आता कारवाईच्या आहेत…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

India Today Conclave 2023 : 

नवी दिल्ली : पूर्वी देशात घोटाळ्यांच्या बातम्या जास्त असायच्या. पण आता भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाईच्या बातम्या जास्त असतात, असं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी विरोधकांना स्पष्ट इशारा दिला. पंतप्रधान मोदी आज (शनिवारी) इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये (India Today Conclave) बोलत होते. यावेळी इंडिया टुडे ग्रुपचे प्रमुख अरुण पुरी यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. तसंच सातव्यांदा या कॉन्क्लेव्हमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त केले. (Prime Minister Narendra Modi arrived at the India Today Conclave on Saturday)

पंतप्रधान मोदी म्हणाले, आज सर्व तज्ञ आणि मोठे मोठे विश्लेषक एका आवाजात म्हणतात, ही भारताची वेळ आहे. मी 20 महिन्यांपूर्वी लाल किल्ल्यावरून सांगितले होते, हीच योग्य वेळ आहे. आज जगातील मोठे अर्थतज्ञ, विश्लेषक, विचारवंत म्हणतात की “It is India’s Moment”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ते म्हणाले की, आज अनेक जागतिक आव्हानं आहेत. 100 वर्षातील सर्वात मोठी महामारी हे मोठे संकट होते. दोन देशांमध्ये अनेक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. संपूर्ण जगाची पुरवठा साखळीच विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत ‘द इंडिया मोमेंटबद्दल’ बोलणं ही गोष्ट साधी नाही. हा एक नवा इतिहास घडत आहे, ज्याचे आपण सगळेच साक्षीदार आहोत.

पंतप्रधान म्हणाले की, आज संपूर्ण जग भारताबद्दल विश्वास व्यक्त करत आहे. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज भारत जगातील नंबर वन स्मार्टफोन डेटा ग्राहक आहे. आज भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश आहे. आज भारतात जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इको-सिस्टम आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर चर्चा होत नाहीत.

ADVERTISEMENT

India Today Conclave 2023 : वाढत्या वयाला कसं थांबवायचं? ‘हा’ आहे फॉर्म्यूला

ADVERTISEMENT

पंतप्रधानांनी वाचला सरकारच्या 75 दिवसांतील कामांचा पाढा :

यावेळी मोदी यांनी सांगितलं की, 2023 मधील 75 दिवस पूर्ण झाले आहेत. या 75 दिवसांत देशाचे ऐतिहासिक ग्रीन बजेट आले. कर्नाटकातील शिवमोगा विमानतळाचे उद्घाटन झाले. मुंबईत मेट्रोचा पुढचा टप्पा सुरू झाला. देशात जगातली सर्वात मोठी रिव्हर क्रूझ सुरू झाली. बंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्ग सुरू झाला. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला. वंदे भारत ट्रेन मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. IIT धारवाडच्या कॅम्पसचे उद्घाटन झाले. अंदमान-निकोबार बेटांवरील 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावं दिली.

India Today Conclave 2023 : PM मोदींनी स्वप्न पाहायला शिकवलं : अमित शाह

तुमकुरूमध्ये आशियातील सर्वात मोठ्या आधुनिक हेलिकॉप्टर कारखान्याचे उद्घाटन झाआले. एअर इंडियाने जगातील सर्वात मोठी एव्हिएशन ऑर्डर दिली आहे. मोदींनी सांगितलं की, सरकारने 8 कोटी नवीन नळजोडण्या देण्याचं काम केलं आहे. उत्तर प्रदेश-उत्तराखंडमधील रेल्वे नेटवर्कचे 100 टक्के विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये नवीन चित्त्यांची तुकडी दाखल झाली आहे. 2 ऑस्करही जिंकल्याचा आनंद भारताने या 75 दिवसांमध्ये अनुभवला असल्याचं ते म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT