Rajya Sabha Election : मनसेचं एक मत भाजपलाच! राज ठाकरेंनी दिला आदेश

राज्यसभा निवडणूक चुरशीची होणार आहे यात काहीच शंका नाही
Rajya Sabha Election : मनसेचं एक मत भाजपलाच! राज ठाकरेंनी दिला आदेश
Rajya Sabha Election: Only MNS MLA vote for BJP Order given by Raj Thackerayr

राज्यसभा निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. १० जूनला राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. सहाव्या जागेसाठी चुरस रंगली आहे. अशात मनसेच्या एकमेव आमदाराने म्हणजेच राजू पाटील यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेला संजय पवार यांना जिंकवण्यासाठी आणि भाजपला धनंजय महाडिक यांना जिंकवण्यासाठी लहान पक्षांची, अपक्ष आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्याकडून लहान पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदारांच्या भेटी घेतल्या जात आहेत.

याच रणनीतीचा एक भाग म्हणून भाजपचे नेत आशिष शेलार हे आज राज ठाकरेंना भेटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आशिष शेलार यांनी भेट घेतली. ही भेट घेतल्यानंतर आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना म्हटलं, पक्षाच्या वतीने येत्या राज्यसभा निवडणुकीत मनसेचं जे एक मत आहे ते भाजप उमेदवाराला मिळावं अशी विनंती मी राज ठाकरेंना केली. मी धन्यवाद व्यक्त करतो की, राज ठाकरेंनी आमच्या विनंतीला मान दिला आणि मला सांगितलं. ते मत भाजपला मिळेल. त्यामुळे आमचा विजय अधिक सुकर आणि सोपा होईल.

राज्यसभेच्या 6 जागांपैकी 2 जागा निवडून आणण्याची मतदान क्षमता भाजपकडे आहे. मात्र भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडीक यांना निवडून आणण्यासाठी भाजपला 18 अतिरिक्त मतांची बेगमी करावी लागणार आहे. भाजपने तिसरा उमेदार रिंगणात उतरवला आहे आणि त्यामुळे निश्चितच त्यांच्या विजयाचेही गणित सोडवण्यासाठी रणनिती आखली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी भेट घेतली. वर्षा निवासस्थानी समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार दाखल झाले. यानंतर अबू आझमींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीनंतर अबू आझमी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

अबू आझमी यांनी म्हटलं, आज मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मी त्यांच्यासमोर मागण्यांचा पाढा वाचला. माझ्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in