पंकजा मुंडे वाऱ्यावर अन्…; फडणवीसांच्या ‘त्या’ भूमिकेवर संजय राऊतांनी ठेवलं बोट
राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना भाजपने डावलल्याचं म्हटलं आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर केल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला असून, देवेंद्र फडणवीसांनी नुपूर शर्मा यांना दिलेल्या पाठिंब्यावरून टीका केली आहे. संजय राऊत यांनी रोखठोकमधून राज्यसभा निवडणूक, विधान परिषद निवडणूक, नुपूर शर्मा विधान आणि पंकजा मुंडे […]
ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना भाजपने डावलल्याचं म्हटलं आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर केल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला असून, देवेंद्र फडणवीसांनी नुपूर शर्मा यांना दिलेल्या पाठिंब्यावरून टीका केली आहे.
संजय राऊत यांनी रोखठोकमधून राज्यसभा निवडणूक, विधान परिषद निवडणूक, नुपूर शर्मा विधान आणि पंकजा मुंडे आदी विषयांवर भाष्य केलं आहे.
संजय राऊतांनी काय म्हटलंय?
“विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या द्यायच्या, सत्तेची पदे द्यायची, पण पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असे भाजपचे धोरण दिसते. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची फळी उभी करायची आहे व त्या फळीत जुन्या निष्ठावान भाजप पदाधिकाऱ्यांना स्थान दिसत नाही,” असं राऊत म्हणाले.