भाजप-मनसे युतीला रामदास आठवलेंचा विरोध कायम; उद्धव ठाकरेंनाही दिला सल्ला
मिथीलेश गुप्ता, प्रतिनिधी कल्याण: कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका खाजगी कामानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले होते. यावेळी त्यांनी दसरा मेळाव्याबाबत बोलताना खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे, दसरा मेळाव्याची त्यांनाच परवानगी मिळाली पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही. त्याच बरोबर २/३ मेजॉरिटीची एकनाथ शिंदेंसोबत […]
ADVERTISEMENT

मिथीलेश गुप्ता, प्रतिनिधी
कल्याण: कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात एका खाजगी कामानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले होते. यावेळी त्यांनी दसरा मेळाव्याबाबत बोलताना खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे, दसरा मेळाव्याची त्यांनाच परवानगी मिळाली पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही. त्याच बरोबर २/३ मेजॉरिटीची एकनाथ शिंदेंसोबत आहे, त्यामुळे महानगरपालिकेनं त्यांना परवानगी द्यावी असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत.
मनसेला सोबत घेतल्यास भाजपचा तोटा- रामदास आठवले
मागच्या अनेक दिवसांपासून मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. यावरुन भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चा सुरु आहे. यावरती आठवले म्हणाले ”भाजप-मनसे युती झाल्यास आपला विरोध कायम असल्याचं स्पष्ट केलं आहे. यावेळी आठवले यांनी व्यक्तिगत पातळीवर राज ठाकरे यांना भेटण्यास काही हरकत नाही, मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही.
रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत आहे. एकनाथ शिंदेंचा गट हा भाजप सोबत आलेला आहे. मागच्या वेळेला भाजप आणि आरपीआय एकत्र असताना मुंबईत 82 जागा निवडून आणल्या होत्या. यंदा देखील 114 जागा निवडून येण्यात काही अडचण येणार नाही असं रामदास आठवले म्हणाले आहेत.