‘बाळासाहेबांचा मुलगा’, काही संशय आहे का?; उद्धव ठाकरेंवर टीका करताना रामदास कदमांचं विधान
दापोलीतल्या सभेत रामदास कदमांचा पूर्ण रोख होता, तो आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर. मला संपवण्याचा एककलमी कृती कार्यक्रमच मातोश्रीवर हाती घेण्यात आला होता, असं म्हणताना रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंच्या विधानावर बोट ठेवलं. त्यावर बोलताना रामदास कदमांनी जे विधान केलंय, त्याची आता जोरात चर्चा सुरूये. यावेळी रामदास कदमांनी रश्मी ठाकरेंवरही टीका केली. फडणवीस सरकारच्या काळात […]
ADVERTISEMENT

दापोलीतल्या सभेत रामदास कदमांचा पूर्ण रोख होता, तो आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर. मला संपवण्याचा एककलमी कृती कार्यक्रमच मातोश्रीवर हाती घेण्यात आला होता, असं म्हणताना रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंच्या विधानावर बोट ठेवलं. त्यावर बोलताना रामदास कदमांनी जे विधान केलंय, त्याची आता जोरात चर्चा सुरूये. यावेळी रामदास कदमांनी रश्मी ठाकरेंवरही टीका केली.
फडणवीस सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री राहिलेल्या रामदास कदम यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये स्थानच मिळालं नाही. इतकंच काय, तर नंतर विधान परिषदेत पुन्हा उमेदवारीही देण्यात आली नाही. त्यानंतर रामदास कदम मातोश्री आणि शिवसेनेच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याचं दिसून आलं.
तब्बल दोन अडीच वर्षांपासून मौन बाळगलेल्या रामदास कदमांनी आता थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरच टीकेची उठवलीये. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर रामदास कदमांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंवर टीका केली होती. त्यानंतर आता दापोलीतल्या सभेत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर रामदास कदमांनी हल्लाबोलच चढवला.
मुख्यमंत्री व्हावं म्हणून उद्धव ठाकरेंवर रश्मी ठाकरे ओरडल्या?; रामदास कदमांनी काय म्हटलंय?