Sandeep Deshpande : संदीप देशपांडे राज ठाकरेंच्या घराबाहेरुन का पळून गेले?
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरुन पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढणारे मनसेचे नेते संदीप देशपांडे अखेर समोर आले आहेत. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानसमोर पोलीस संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी आपल्या गाडीतून पळ काढला होता. तेव्हापासून त्यांचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत. ते अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. असं […]
ADVERTISEMENT

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरुन पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढणारे मनसेचे नेते संदीप देशपांडे अखेर समोर आले आहेत. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानसमोर पोलीस संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी आपल्या गाडीतून पळ काढला होता. तेव्हापासून त्यांचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत. ते अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. असं असताना एका व्हीडिओच्या माध्यमातून ते आता समोर आले आहेत.
मशिदीवरील भोंग्यांबाबत अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात येत आहे. तर काही जणांची धरपकड देखील सुरु आहे. असं असताना आज (4 मे) संदीप देशपांडे यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन पळ काढला. त्यानंतर आता एका व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी आपली बाजू मांडली आहे.
पाहा व्हीडिओमध्ये संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले:
‘आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास मी, संतोष धुरी आम्ही राज ठाकरेंना भेटण्यासाठी गेलो होतो. तिथून बाहेर आल्यावर मीडियातील अनेक लोकं उभे होते. ज्यांना बाइट हवा होता. आम्ही त्यांना बाइट देत असताना शिवाजी पार्कचे पोलीस इन्स्पेक्टर कासार साहेब हे आले आणि मला खेचायला लागले. तेव्हा मी त्यांना विचारलं की, आपण मला ताब्यात घेताय का? तसं असेल तसं सांगा. मी तुमच्यासोबत यायला तयार आहे.’