संजय राठोडांविरुद्ध उद्धव ठाकरेंची रणनीती! संजय देशमुखांच्या माध्यमातून देणार ‘शह’?

भागवत हिरेकर

शिंदे गटात गेलेल्या कॅबिनेट मंत्री संजय राठोडांना आगामी निवडणुकीत शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी चहूबाजूंनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केलीये. काही दिवसांपूर्वी पोहरादेवी गडावरील महंतांना शिवसेनेत आणून ठाकरेंनी संजय राठोडांविरुद्ध पहिली खेळी केली. त्यानंतर ठाकरेंनी आता संजय राठोडांविरुद्ध ‘संजय’चा पर्याय समोर आणलाय. हे संजय आहेत भाजपचे माजी मंत्री संजय देशमुख. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिंदे गटात गेलेल्या कॅबिनेट मंत्री संजय राठोडांना आगामी निवडणुकीत शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी चहूबाजूंनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केलीये. काही दिवसांपूर्वी पोहरादेवी गडावरील महंतांना शिवसेनेत आणून ठाकरेंनी संजय राठोडांविरुद्ध पहिली खेळी केली. त्यानंतर ठाकरेंनी आता संजय राठोडांविरुद्ध ‘संजय’चा पर्याय समोर आणलाय. हे संजय आहेत भाजपचे माजी मंत्री संजय देशमुख.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या संजय राठोड ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या गटात गेले. शिंदेंच्या सोबत गेलेल्या शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे. संजय राठोडांच्या बदलेल्या भूमिकेबद्दलची नाराजी ठाकरेंनी काही वेळा बोलून दाखवलीये आणि आता त्यांना शह देण्यासाठी ठाकरेंनी तयारी सुरू केल्याचंही दिसतं आहे.

दिग्रसचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. संजय देशमुखांनीही याला दुजोरा दिलाय. संजय देशमुखांचा ठाकरे गटातला प्रवेश संजय राठोडांसमोरच्या आव्हानात भर टाकणारा, तर भाजपला धक्का असल्याचं मानलं जात आहे. संजय देशमुखांच्या शिवसेनेतल्या प्रवेशामुळे दिग्रसची समीकरण बदलणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दिग्रस मतदारसंघ : संजय राठोड विरुद्ध संजय देशमुख

दिग्रस मतदारसंघातल्या राजकारणात संजय राठोड आणि संजय देशमुख महत्त्वाचे नेते आहेत. संजय राठोड आणि संजय देशमुख दोघेही मूळचे शिवसैनिक आहेत. दोघांचा राजकीय प्रवासाची सुरूवात शिवसेनेतून झालीये.

हे वाचलं का?

    follow whatsapp