'अबू जिंदाल, अजमल कसाब'; संजय राऊत, अनिल देशमुखांनी सांगितले तुरुंगातील झोप उडवणारे अनुभव - Mumbai Tak - sanjay raut anil deshmukh shares there jail exprince - MumbaiTAK
बातम्या मुंबई Tak बैठक राजकीय आखाडा

‘अबू जिंदाल, अजमल कसाब’; संजय राऊत, अनिल देशमुखांनी सांगितले तुरुंगातील झोप उडवणारे अनुभव

अनिल देशमुख तब्बल 14 महिने तुरुंगात होते, तर संजय राऊत ऑर्थर रोड तुरुंगात होते. या दोन्ही नेत्यांनी मुंबई Tak बैठकीतील तुरुंगात आलेले अनुभव सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि खासदार संजय राऊत यांना ईडीच्या प्रकरणात तुरुंगात राहावं लागलं. अनिल देशमुख तब्बल 14 महिने तुरुंगात होते, तर संजय राऊत ऑर्थर रोड तुरुंगात होते. या दोन्ही नेत्यांनी मुंबई Tak बैठकीतील तुरुंगात आलेले अनुभव सांगितले.

तुम्ही एकमेकांना तुरुंगाता भेटला होतात का? यावर संजय राऊत म्हणाले, “आम्ही अधूनमधून भेटत होतो. नाही असं नाही. ते भेटणं काय भेट असते का?” तुम्हाला एकत्र ठेवलं होतं का? यावर अनिल देशमुख म्हणाले, “तुरुंगात वकिलांना भेटायला जावं लागतं आणि त्यावेळी राऊतांची भेट व्हायची.

यावेळी संजय राऊतांनी तुरुंगातील अनुभव सांगितला. राऊत म्हणले, “आम्ही कुठे राहिलो होत माहितीये का? जिथे अबू जिंदाल, अजमल कसाब यांना ठेवलं होतं. त्या जागेमध्ये आम्ही होतो. रेकॉर्डवर आहे.”

अनिल देशमुख म्हणाले, “जे संजय राऊतांनी सांगितलं ना… बरॅक नंबर 12 मध्ये. ज्याठिकाणी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला ठेवलं होतं. त्या बराकमध्ये अनिल देशमुखला ठेवलं होतं.”

हेही वाचा >> ‘माझं मेस्सीसारखं झालंय’, एकनाथ शिंदेंवर घणाघात, आदित्य ठाकरे काय म्हणाले?

यालाच जोडून संजय राऊत पुढे म्हणाले, “अंडा सेल ज्याला म्हणतात आम्ही तिथे होतो. सिक्युरिटी अंडा सेल, तिथे तुमचा कुणाशी संपर्कच नसतो. आमची मागणी असायची की, आम्हाला सूर्याचा प्रकाश मिळत नाहीये. सूर्याची किरणंही पाहत नाही. थोडातरी प्रकाश आमच्यावर येऊद्या. अनेक आजार उत्पन्न होतात. आमची एकही मागणी मान्य केली नाही. आमच्या जमिनीतून मुंग्या, किडे निघायचे. आता या लाईट्स दिसतात. त्याच्याखाली आम्ही झोपायचो. अंधार करायचा नाही. कोठडीत प्रखर लाईट्स असतात. तिथेच झोपायचं. तुम्ही दहा मिनिटं झोपून दाखवा तिथं.”

अनिल देशमुख म्हणाले, “मला कसाबच्या बराकमध्ये ठेवलं होतं. तर कसाबवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करू नये म्हणून त्या संपूर्ण बिल्डिंगला तीन इंचाच्या लोखंडी पत्र्याने पूर्ण बिल्डिंग झाकली होती. हवा नाही, लाईट नाही, काही नाही.”

पुढे संजय राऊत म्हणाले, “बुलेट प्रूफ, बॉम्ब प्रूफ लोखंडी भिंती होत्या. त्यात आम्ही होतो. दहशतवादी असल्यासारखं ठेवले होतं.

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…