MLC Election Result: तांबे की पाटील? अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष नाशिककडे
Satyajeet Tambe or Shubhangi Patil who will be Elected: नाशिक: राज्यातील पाच विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकांचा (Vidhan Parishad Election) निकाल आज (2 फेब्रुवारी) जाहीर होणार आहे. मात्र, या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून नाशिक पदवीधर मतदारसंघ चर्चेत होता. काँग्रसे नेते सत्यजीत तांबेंची (Satyajeet Tambe) बंडखोरी आणि शुभांगी पाटलांना (Shubhangi Patil) महाविकास आघाडीने दिलेला पाठिंबा या सगळ्या घडामोडींमुळे […]
ADVERTISEMENT

Satyajeet Tambe or Shubhangi Patil who will be Elected: नाशिक: राज्यातील पाच विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकांचा (Vidhan Parishad Election) निकाल आज (2 फेब्रुवारी) जाहीर होणार आहे. मात्र, या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून नाशिक पदवीधर मतदारसंघ चर्चेत होता. काँग्रसे नेते सत्यजीत तांबेंची (Satyajeet Tambe) बंडखोरी आणि शुभांगी पाटलांना (Shubhangi Patil) महाविकास आघाडीने दिलेला पाठिंबा या सगळ्या घडामोडींमुळे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे नाशिक मतदारसंघाकडे लागून राहिलं आहे. (satyajeet tambe or shubhangi patil who will be elected maharashtras focus is on nashik graduate constituency mlc election result)
या निवडणुकीत सत्यजीत तांबे की शुभांगी पाटील नेमकं बाजी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेले असताना मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी विजय आपलाच असल्याचा दावा केला आहे. ‘मतमोजणी फक्त फॉर्मालिटी बाकी आहे, विजय आपलाच आहे. आमदार नसताना मी अनेक कामे केले, त्यामुळे जनतेला विश्वास आहे की, ही आमदार झाल्यावर दहा पट जादा काम करेल.’ असं शुभांगी पाटील म्हणाल्या.
विधान परिषद 2023: मी नॉट रिचेबल का होते ते वेळ आल्यावर..: शुभांगी पाटील
तर दुसरीकडे निकालाआधीच सत्यजीत तांबे यांचे आमदार झाल्याचे बॅनर्स नाशिक पदवीधर मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहेत. यामुळे आता या दोघांपैकी कोण बाजी मारणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.










