खातेवाटपावरुन शिंदे गटातील मंत्री नाराज?, शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितलं
मुंबई: शिंदे मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षीत विस्तार पार पडला त्यानंतर खाते वाटप झाले. शिंदे गटात्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधीनंतरच शिंदे गटातील नाराजी समोर आली होती. संजय शिरसाट यांनी ती बोलून दाखवली होती, नंतर त्यांनी सारवासारव केली. आता खातेवाटप झाल्यानंतरही शिंदे गटातील खदखद बाहेर येत आहे. यावर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी […]
ADVERTISEMENT

मुंबई: शिंदे मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षीत विस्तार पार पडला त्यानंतर खाते वाटप झाले. शिंदे गटात्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधीनंतरच शिंदे गटातील नाराजी समोर आली होती. संजय शिरसाट यांनी ती बोलून दाखवली होती, नंतर त्यांनी सारवासारव केली. आता खातेवाटप झाल्यानंतरही शिंदे गटातील खदखद बाहेर येत आहे. यावर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खातेवाटपावरुन शंभूराज देसाई काय म्हणाले?
आमच्या ९ पैकी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. जाणिवपूर्वक वावड्या उठवल्या जात आहेत. आम्ही पहिल्याच दिवशी आमचे पूर्ण अधीकार एकनाथ शिंदे यांना दिले होते. आम्ही तसा ठराव देखील केला. त्यामुळे कोणीतरी अशा वावड्या उठवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये असे शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
आमच्यामध्ये दूही निर्माण करण्याचा प्रयत्न- शंभूराज देसाई
आज सामानातून बंडखोरांवरती पुन्हा एकदा टीकास्त्र डागण्यात आले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शंभूराज म्हणाले ”मागील 2 महिन्यांपासून सामनातून काय वक्तव्य येत आहेत हे महारष्ट्र पाहत आहे. आमच्यामध्ये दूही निर्माण करण्याचा प्रकार सुरु आहे. परंतु आमची एकी कोणी तोडू शकणार नाही.” वंदे मातरम् बाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असेही देसाई म्हणाले.
”नाक मुठीत धरूनच ‘त्या’ 50 जणांना फडणवीसांकडे जावे”, सामनातून बंडखोरांवर टीकास्त्र