राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र निवडणुका लढणार?; राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ठपका ठेवत शिवसेना आमदारांनी बंड केलं. त्यामुळे यापुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतच पुन्हा एकदा शिवसेनेला सोबत घेण्याबद्दल अनुकूलता दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत बोलताना शरद पवार यांनी आगामी […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ठपका ठेवत शिवसेना आमदारांनी बंड केलं. त्यामुळे यापुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतच पुन्हा एकदा शिवसेनेला सोबत घेण्याबद्दल अनुकूलता दर्शवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत बोलताना शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्याबद्दल भूमिका मांडली आहे.
या बैठकीत बोलताना शरद पवार म्हणाले, ‘आता संघटनेसाठीचा पुढचा कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेते देतील. राज्यात पाऊस चांगला सुरु आहे. पर्जन्यकाळ संपल्यावर आपल्याला जोमाने काम करायचे आहे. पुढचे अडीच वर्ष जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून, संघटना बळकट करणे, लोकांच्या अडचणी समजून घेणे यासारखी कामं करायची आहेत.’
‘सुदैवाने आपल्याकडे विरोधी पक्षनेतेपद असल्यामुळे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ आपल्याकडे आहे. तरीही लोकांवर अन्याय होत राहिला तर लोकशाहीच्या चौकटीत रस्त्यावर उतरायचा देखील निर्णय आपल्याला घ्यावा लागेल,’ असं सांगत शरद पवारांनी विविध प्रश्नांवर आवाज उठवण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.