राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार राहणार की जाणार?, ‘या’ तारखेला होणार निर्णय

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

sharad pawar withdraw resignation there big leader advised
sharad pawar withdraw resignation there big leader advised
social share
google news

महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा शरद पवार या नावाभोवती फिरत आहे. लोक माझे सांगाती पुस्तक प्रकाशन समारंभात पवारांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अजित पवारांच्या बंडाच्या चर्चांनंतर पवारांनी भाकरी फिरवण्याचं विधान केलं आणि काही दिवसांतच घोषणा केली. इथूनच राष्ट्रवादीतील राजकारणाला कलाटणी मिळाली. सध्या पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावं यासाठी मनधरणी केली जात असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर पवारांनी त्यांची भूमिकाही स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पावलं सध्या सिल्व्हर ओकच्या दिशेनं वळू लागली आहेत. शरद पवारांनी निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी वेळ मागितला असला, तरी ते निर्णयावर ठाम राहतील अशीच शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा >> शरद पवारांनी दिले वेगळेच संकेत; ‘त्या’ विधानाचा अर्थ काय?

अध्यक्षपद सोडण्याबाबतचा निर्णय आणि त्याबद्दल चर्चा न केल्याबद्दलही त्यांनी वरिष्ठ नेत्यांना माहिती दिली. महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांनी यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार स्थापन करण्यात आलेल्या समितीला दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना शरद पवारांनी काय सांगितलं?

– शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी ही बाब मान्य केली की अध्यक्षपदावरून पायउतार होण्याबद्दलचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन घ्यायला हवा होता, अशी माहिती सुत्रांनी दिली.

– पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना असंही म्हणाले की, या निर्णयाबद्दल जर मी प्रत्येकाला विचारलं असतं, तर साहजिक आहे की त्यांनी याला विरोध केला असता आणि त्यामुळेच याची थेट घोषणा करण्याचा निर्णय घेतला.

ADVERTISEMENT

– शरद पवारांनी या बैठकीत सांगितलं की, आता समितीची बैठक बोलवा. 5 किंवा 6 मे रोजी ही बैठक बोलवून समितीने यासंदर्भात निर्णय घ्यावा. जो निर्णय समितीकडून घेतला जाईल, तो मी स्वीकारेन.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> जयंत पाटील म्हणतात मला बैठकीचं निमंत्रण नाही, तर तटकरे म्हणाले ‘अहो…’

– 1 मे 1960 रोजी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली. त्यामुळे 1 मे या तारखेशी माझा विशेष ऋणानुबंध आहे. त्यामुळेच मी युवक काँग्रेसच्या मागच्या बैठकीत भाकरी फिरवण्याची इच्छा बोलून दाखवली, असंही पवार वरिष्ठ नेत्यांशी बोलताना म्हणाल्याचं सुत्रांनी सांगितलं.

– तरुणांच्या मतांचा गांभीर्याने विचार करणारा मी नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचाही मी आदर करतो. ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणींना आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचे आहे, असंही पवारांनी यावेळी सांगितलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT