Raut: ‘शिंदे सरकार फेब्रुवारीही पाहणार नाही, राऊतांनी कारणच सांगितलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sanjay Raut Statement on Shinde Government: नाशिक: राज्यातील सरकार हे फेब्रुवारी महिना बघणार नाही. असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. नाशिक (Nashik) दौऱ्यावर असणाऱ्या राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधताना यावेळी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Govt) कडवट टीका केली आहे. (shinde government will not even see the month of february sanjay raut claimed)

‘मी जे म्हणतोय की, हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही. ते माझं मत पक्कं आहे. जर आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही. येईल असं मला वाटत नाही. तर संविधान, घटना आणि कायदा याचं उल्लंघन करणारं हे बेकायदेशीर सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही.’ असा दावाच यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

‘हे सरकार अत्यंत ठोंब्याप्रमाणे बसून काम करतंय. काम करत नाहीए. त्यांची कामं वेगळ्या पद्धतीने सुरु आहेत. सरकारमध्ये सरळसरळ दोन पद्धतीने गट पडलेले आहेत. तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघतो. हे तुमचं तुम्ही बघावाले जे आहेत. यांचं सरकार 40 आमदारांच्या पलीकडे नाही. 40 आमदारांची ख्याली खुशाली हे त्यांचं सरकार.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘पण हळूहळू चित्र बदलतंय.. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एका परिवर्तनाच्या दिशेने चाललं आहे. 2024 ची तयारी सुरु आहे. पण त्याच्या आधीही परिवर्तन होऊ शकेल.’

‘मी जे म्हणतोय की, हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही. ते माझं मत पक्कं आहे. जर आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही. येईल असं मला वाटत नाही. तर संविधान, घटना आणि कायदा याचं उल्लंघन करणारं हे बेकायदेशीर सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही.’

ADVERTISEMENT

संजय राऊतांना मोठा धक्का; सावली सारखे सोबत असणारे भाऊसाहेब चौधरी शिंदे गटात

ADVERTISEMENT

‘जो कायदा आणि संविधान सांगतो त्यानुसार 16 आमदार हे अपात्र ठरतील. म्हणून फक्त वेळकाढू धोरण सुरू आहे. सरकार व्हेंटिलेटरवर आहे. ते काढलं सर्वोच्च न्यायालयाने तर हे राम.. मग कोणी त्यांच्या बरोबर राहणार नाही.’

‘आता हे सरकार कधी उलथवायचं आणि निवडणुकांना कधी सामोरं जायचं या प्रतिक्षेत जनता आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना हा वटवृक्ष आहे. वटवृक्षाचा खाली पालपाचोळा, कचरा पडतो.. तो कचरा काही जण उचलून नेत आहेत.’

‘त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषणं करत आहे. पण कचरा हा आग लावण्यासाठी असतो ना.या कचऱ्याचा धूर काही फार काही राहत नाही.’

‘हे सगळे भाजपमध्ये जातील.. यांना दुसरा पर्याय नाही. हे अपात्र ठरतायेत. हे सगळ्यांना माहिती आहे. हे त्यांनाही माहितीए. ते दिवस ढकलतायेत. जर ते अपात्र ठरले नाहीत तर तो संविधानाचा सर्वात मोठा अपमान ठरेल.’

‘कोर्टाला या आमदारांना अपात्र करावंच लागेल. कारण कायदाच ते सांगतोय. आपल्या संविधानातील. अशावेळी हे 16 आधी अपात्र ठरतील आणि नंतर उरलेले अपात्र होतील. हे मी कायद्याच्या चौकटीतील विधान करतोय.’

शिंदे-फडणवीस सरकार 2019 मध्येच यायला हवं होतं, पण… : एकनाथ शिंदे यांंचं मोठं विधान

‘हा निर्णय फेब्रुवारी महिन्यापर्यंत लागला तर हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही.’ असं म्हणत संजय राऊत यांनी राज्यातील सरकार बेकायदा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे आता राऊतांचा हा दावा खरा ठरतो की खोटा हे कोर्ट आणि येणारा काळच ठरवेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT