Shiv Sena: ’50 खोके…’ संतोष बांगर ठाकरेंच्या खासदाराच्या पाया पडले लोक मागून ओरडले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

shinde group mla santosh bangar was provoked by thackeray group workers during a wedding ceremony in parbhani political news of maharashtra
shinde group mla santosh bangar was provoked by thackeray group workers during a wedding ceremony in parbhani political news of maharashtra
social share
google news

Political News of Maharashtra परभणी: शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांना पुन्हा एकदा 50 खोकेंवरुन टार्गेट करण्यात आलं आहे. खरं तर संतोष बांगर हे लग्न समारंभासाठी परभणी येथे गेले होते. तिथेच त्यांच्यासमोर ठाकरेंचे खासदार बंडू जाधव आले. तेव्हा बांगर जाधवांसमोर नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं. पण त्याचवेळी ठाकरे गटाच्या (Thackeray Group)शिवसैनिकांनी लग्नसमारंभामध्येच बांगरांना डिवचलं. नेमकं काय घडलं, संतोष बांगर ठाकरेंच्या खासदारासमोर नतमस्तक झाल्यावर शिवसैनिकांनी काय केलं, हेच आपण सविस्तर जाणून घेऊया. (shinde group mla santosh bangar was provoked by thackeray group workers during a wedding ceremony in parbhani)

संतोष बांगर आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक, पदाधिकारी आमनेसामने आल्यावर संघर्ष होणं ही नेहमीची गोष्ट झाली आहे. मंगळवारी 30 मेला पुन्हा एकदा बांगर आणि ठाकरे गट आमने-सामने आले. यावेळी निमित्त होतं. परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवगाव इथल्या एका लग्नसमारंभाचं.

50 खोके, एकदम ओकेच्या घोषणा…

यावेळी संतोष बांगर आणि ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव आमनेसामने आले. ज्येष्ठ शिवसैनिक, पदाधिकारी असलेल्या जाधवांना बघून बांगर यांनी खासदारांना चरणस्पर्श केला.यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बंडू जाधव यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. तसंच बांगरांसमोरच ’50 खोके, एकदम ओके’ घोषणाही दिल्या. पण या घोषणाकडे दुर्लक्ष करत बांगर पुढच्या दिशेने रवाना झाले. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिवसेनेत बंड झाल्यापासून एकनाथ शिंदेंसोबत गेल्या आमदार, खासदारांना सार्वजनिक कार्यक्रमात पन्नास खोके, एकदम ओकेच्या घोषणांचा सामना करावा लागतोय. शिंदेंसोबत गेलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही खोक्यांच्या घोषणांमुळे कशी कोंडी झाली आहे, असं त्यांनी स्वत: म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

‘दादुड्या “मूछ” कधी काढतोय?’ संतोष बांगरांना ‘ते’ चॅलेंज आलं अंगलट

हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेले तेव्हापासूनच ते वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच बांगर हे आपल्या एका चँलेंजमुळे वादात सापडले होते.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी कळमनुरी बाजार समितीचा निकाल लागला होता. त्यावेळी शिवसेना आमदार संतोष बांगर विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली. मविआने आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे निवडणूक लढवत बांगरांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. 17 पैकी केवळ 5 जागांवर बांगरांच्या पॅनेलला समाधान मानावं लागलं. तर मविआला तब्बल 12 जागा मिळाल्या. मविआने बांगरांना चारीमुंड्या चीत केलं. पण गोष्ट निकालानंतर संपली नाही, तर बांगर स्वतःच दिलेल्या एका चॅलेंजमुळे अडचणीत आले.

औंढा नागनाथ इथे बाजार समितीच्या प्रचारसभेत बोलताना बांगरांनी मिशा कापण्याची भाषा केली होती. पण निकालानंतर विरोधक हाच व्हिडिओ शेअर करत बांगरांना आता मिशा कापा, असं म्हणत डिवचत होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT