देवेंद्र फडणवीसांची भेट-शिंदे गटात जाणार?; शिवसेना आमदार राजन साळवींनी मांडली भूमिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या नेत्यांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. त्यातच शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. राजन साळवी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याची आणि शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली. त्यावर आता राजन साळवींनी सविस्तरपणे भूमिका मांडलीये.

राजन साळवी यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की, “काल सायंकाळपासून माध्यमांकडून मला असं समजलं की, मी (राजन साळवी) देवेंद्र फडणवीसांना भेटलो आणि शिंदे गटात सामील होणार, अशा बातम्या आल्या आहेत. गेल्या ४० वर्षांपासून मी शिवसेनेत काम करतोय. शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, शिवसेनेचा तीन वेळा आमदार आणि शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय.”

मी पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरेंसोबत -राजन साळवी

“महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी झाल्यात, पण मी आधीच सांगितलंय की आमच्या निष्ठा बाळासाहेबांच्या चरणी आहेत. माझ्याही निष्ठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पायाशी आहेत. त्यामुळे मी पहिल्या दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत आहे”, असं राजन साळवी यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“बातम्यांमधून असं कळलं की, मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो. मी शिंदे गटात जाणार आहे. त्यामुळे मी खुलासा करू इच्छितो की, मी मरेपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेंसोबत काम करत राहणार आहे.”

आदित्य ठाकरेंसोबत दौरे करतोय; राजन साळवींनी काय म्हटलंय?

“विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मी सहभाग घेतला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासोबत दौऱ्यावर गेलो. आदित्य ठाकरे यांच्यासोबत रायगडमधील अलिबाग विधानसभा मतदारसंघात उपस्थित होतो. महाडमध्येही उपस्थित होतो.”

ADVERTISEMENT

“उद्धव ठाकरेंनी मला उपनेता बनवलं आहे. उपनेता म्हणून माझी जबाबदारी आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या बांधणीसाठी फिरणं. त्यामुळे मागच्या वेळीही आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात मी होतो. पश्चिम महाराष्ट्रातही सहभागी होतो. भविष्यातही मी महाराष्ट्राचा दौरा करणार”, असं राजन साळवींनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

शिवसेनेच्या निष्ठेबद्दल मला कुणी सांगू नये; राजन साळवींचा टोला

“शिवसेनेच्या निष्ठेबद्दल मला कुणी गोष्टी शिकवण्याची गरज नाहीये. ४० वर्षांपासून मी शिवसेनेत काम करतोय. जेव्हा जिल्हाप्रमुख होतो, तेव्हा बाळासाहेबांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च जिल्हाप्रमुख म्हणून मला शिवतीर्थावर मला ढाल दिली होती”, असं राजन साळवी यांनी यावेळी सांगितलं.

“बाळासाहेब ठाकरेंचा सर्वाधिक सहवास मला लाभला”

“२००६ साली बाळासाहेबांनी राजापूर मतदारसंघातून मला उमेदवारी दिली होती. बाळासाहेबांनी मातोश्रीतील देव्हाऱ्यातील खडा दिला होता. तो अजूनही माझ्या अंगठीमध्ये आहे. त्या जिल्ह्यात जे आमदार आहेत, त्यापैकी बाळासाहेबांचा सर्वाधिक सहवास मला मिळाला आहे. त्यामुळे माझ्या निष्ठा बाळासाहेबांच्या पायाशी आहेत. त्यामुळे माझ्याबद्दल शंका घेऊ नये.”

“मी (राजन साळवी) शिवसेनेशी प्रामाणिक राहिलो आहे. माझ्यावर कोणताही प्रभाव पडत नाही. काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल”, असं राजन साळवी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT