NCP: ‘ज्यांच्यामुळे शिंदेंनी शिवसेना सोडली, तेच आता..’, जयंत पाटलांनी चिमटाच काढला!

मुंबई तक

अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. असं असतानाच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंसह शिवसेनेच्या आमदार टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

Shiv Sena MLAs are upset with Ajit Pawar joining the power. At the same time, Jayant Patil has taken Shiv Sena MLAs to task along with Chief Minister Shinde.
Shiv Sena MLAs are upset with Ajit Pawar joining the power. At the same time, Jayant Patil has taken Shiv Sena MLAs to task along with Chief Minister Shinde.
social share
google news

मुंबई: ‘एकनाथ शिंदे गटातील बरेच आमदार नाराज आहे. राष्ट्रवादीमुळे ज्यांनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना सोडली. तीच कारणे पुन्हा त्यांच्या पुढे आणून ठेवली जात आहे.’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील आमदारांना हळूच चिमटा काढला आहे. कारण जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) अन्याय करायचे असे आरोप शिवसेना (ShivSena) आमदारांनी केले होते. असं असताना आता पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हेच शिंदेंच्या सरकारमध्ये आले आहेत. याच मुद्द्यावरुन जयंत पाटलांनी त्यांच्यावर टीका केली आहे. (shiv sena mlas are upset with ajit Pawar joining shinde fadnavis govt jayant patil taunt marathi political status)

‘काहींना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळणार होती. त्यांच्याच जिल्ह्यात ज्यांना विरोध केला तेच कॅबिनेट मंत्री झाले. त्यामुळे अशांचा असंतोष हळूहळू पुढे येईल.’ असं सूतोवाचही जयंत पाटलांनी यावेळी केले आहेत.

पाहा जयंत पाटील नेमकं काय म्हणाले:

‘आमची नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आहे तर अलीकडे महाराष्ट्रात नवीन झालेली नोशनल पार्टी आहे. नोशनल पार्टीने मला निलंबित केलं काय किंवा ठेवलय काय, मी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही मताला प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही.’

‘सध्या केलेल्या कृतीचे समर्थन करणे त्यांना गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp