Shiv sena : फडणवीसांचा संघर्षाचा इशारा, शिवसेनेला का आली दादा कोंडकेंची आठवण?

मुंबई तक

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारविरुद्ध संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. याच मुद्द्यावरून फडवीसांनी सरकारने बोलावलेल्या भोंग्यांबाबतच्या बैठकीला फडणवीस गैरहजर राहिले होते. त्यानंतर आता शिवसेनेनं सामना अग्रलेखातून फडणवीसांवर टीकेचे बाण डागले आहे. शिवसेनेनं म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली असून केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारविरुद्ध संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. याच मुद्द्यावरून फडवीसांनी सरकारने बोलावलेल्या भोंग्यांबाबतच्या बैठकीला फडणवीस गैरहजर राहिले होते. त्यानंतर आता शिवसेनेनं सामना अग्रलेखातून फडणवीसांवर टीकेचे बाण डागले आहे.

शिवसेनेनं म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली असून केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना याबाबत एक सविस्तर पत्र लिहिले याबद्दल आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. फडणवीस यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्र भाजप ज्या मानसिक संक्रमणावस्थेतून जात आहे ते पाहता त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा करता येणार नाही.”

“2019 सालात सत्ता गमावल्यापासून फडणवीस वगैरे लोकांना हे राज्य आपले वाटेनासे झाले आहे. महाराष्ट्राचे मीठ त्यांना बेचव लागू लागले आहे. महाराष्ट्रावर कठोर कारवाई करा म्हणजे काय करायचे? तर या मंडळींना वाटतेय म्हणून राष्ट्रपती राजवट लावून मोकळे व्हायचे. आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी जी कारणे दिली आहेत त्यावर काय बोलायचे! दादा कोंडके हयात असते तर त्यांनी या बोगस कारणमीमांसेवर दुसरा ‘सोंगाड्या’ चित्रपट काढला असता.”

“अमरावतीच्या खासदार-आमदार पती-पत्नीवर पोलिसांनी त्यांच्या अतिरेकी वागण्याबद्दल कारवाई केली. महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाचायची असेल तर ती तुमच्या घरात वाचा. कोणी अडवलंय? पण दुसऱ्यांच्याच घरात जाऊन वाचू हा अट्टहास का, असा प्रश्न मुंबईच्या हायकोर्टानेही विचारला आहे. तरीही राणा दांपत्यावरील कारवाई म्हणजे हिटलरशाही वगैरे असल्याचे फडणवीस बोलतात. राणांचा छळ केला, त्यांना साधे पाणीही दिले नाही. त्या मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांचा छळ केला, अशी थिल्लर पद्धतीची विधाने करणे फडणवीस यांना तरी शोभत नाही.”

हे वाचलं का?

    follow whatsapp