‘बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसात उद्धव ठाकरे त्यांना…’, नितेश राणेंचा खळबळ उडवणारा राजकीय बॉम्ब
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणेंनी देखील ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics Update Today: सिंधुदुर्ग: शिवसेना (UBT)पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नागपूरवर कलंक आहेत अशी टीका केल्यानंतर अवघी भाजप (BJP) त्यांच्यावर आता तुटून पडली आहे. अशावेळी आता भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तर उद्धव ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. (shiv sena ubt uddhav thackeray criticized devendra fadnavis bjp mla nitesh rane criticized thackeray made very serious allegations latest political news maharashtra)
दरम्यान, यावेळी नितेश राणेंनी असाही आरोप केला आहे की, बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रचंड त्रास दिला. त्यांना योग्य वेळी औषधं दिली नाही, त्यांना योग्य वेळी खाणं दिलं नाही.. एवढंच नाही तर ते बाळासाहेबांचा म्हातारा म्हणून उल्लेख करायचे. बाळासाहेबांना प्राण्यांची उपमा देऊन ते हाक मारायचे. असं अत्यंत खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केले आहेत.
पत्रकार परिषदेत नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर तुफान टीका
‘आमचे लगेच संस्कार काढले जातात, पण त्यांचे…’
‘उद्धव ठाकरे हा व्यक्ती अतिशय सुसंस्कृत वाटतो. फार सहानभूती त्याला मिळते. फार कुटुंबवत्सल अशी प्रतिमा त्यांनी लोकांच्या समोर त्यांनी तयार केली आहे. त्याने काही बोललं, कोणावर कितीही वैयक्तिक टीका केली.. कोणाच्या कुटुंबाबत कितीही खालच्या पातळीवर बोलला तरीही कधीही पत्रकारांना त्याची जीभ घसरलेली दिसत नाही.’
हे ही वाचा>> MLA: सत्तेत सहभागी झाले तरी नरहरी झिरवळ म्हणाले, ‘शिवसेनेचे आमदार अपात्र होणार!’
‘पण दुसऱ्या बाजूला आमच्या कुठल्याही नेत्यावर खालच्या पातळीवर टीका करणं.. त्यांच्या शरीरावर बोलणं, कुटुंबीयांवर बोलणं.. त्यांना नावं ठेवणं या काही गोष्टी केल्या.. आणि आम्ही त्याच्यावर टीका केली की, लगेच आमचे संस्कार काढले जातात. आमची जीभ घसरते..’ असं नितेश राणे यावेळी म्हणाले.