Agniveer Yojana’…लष्कर कंत्राटी असेल तर मग कंत्राटी राज्यकर्ते का नकोत?’-उद्धव ठाकरे

मुंबई तक

लष्कर कंत्राटी असेल तर मग राज्यकर्ते कंत्राटी का नकोत? असा सवाल विचारत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत अग्नीवीर या योजनेवर टीका केली आहे. कंत्राटी सैनिक, कंत्राटी लष्कर हा प्रकार मोदी सरकारने आणल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या योजनेवर टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी जे प्रश्न विचारले त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तरं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लष्कर कंत्राटी असेल तर मग राज्यकर्ते कंत्राटी का नकोत? असा सवाल विचारत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत अग्नीवीर या योजनेवर टीका केली आहे. कंत्राटी सैनिक, कंत्राटी लष्कर हा प्रकार मोदी सरकारने आणल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या योजनेवर टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी जे प्रश्न विचारले त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तरं दिली आहेत.

‘…तर तुम्हाला ‘अग्निवीर’ होता येणार नाही’, लष्कराने दिला थेट इशारा

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी अग्नीवीर योजनेबाबत?

अग्नीवीर या योजनेचा युवकांनीच केला आहे. युवक त्यासाठी रस्त्यावर उतरले होते. वीर तुम्ही त्यांना म्हणत आहात पण त्यांच्या डोक्यात अग्नी आहे हे सरकार विसरलं. आम्हाला जे काही देत आहात ते टेंपररी आहे. तसा रोजगार देणार असाल तर कसं होणार हा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. त्याकरता आंदोलनही केलं.

कंत्राटी सैनिक याबाबत तुम्हाला काय वाटतं हे विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की तसं करायचं असेल तर मग सगळीकडेच ही पद्धत आणा. राज्यकर्तेही कंत्राटीच ठेवा. सगळंच आपण एजन्सी नेमून देऊ आणि देऊ कामाला असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp