शिंदे विरुद्ध ठाकरे : कोणासोबत किती खासदार-आमदार अन् पदाधिकारी? फायनल आकडेवारी आयोगासमोर
नवी दिल्ली : खरी शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? हा वाद निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. तो सोडविण्यासाठी आयोगाने दोन्ही बाजूंना कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन्ही गटांकडून ती सादर करण्यात आली आहेत. यानंतर आता निवडणूक आयोग कधी आणि काय निर्णय देणार याकडे दोन्ही गटांप्रमाणेच महाराष्ट्र आणि देशाचेही लक्ष लागले आहे. मात्र, […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली : खरी शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? हा वाद निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. तो सोडविण्यासाठी आयोगाने दोन्ही बाजूंना कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन्ही गटांकडून ती सादर करण्यात आली आहेत. यानंतर आता निवडणूक आयोग कधी आणि काय निर्णय देणार याकडे दोन्ही गटांप्रमाणेच महाराष्ट्र आणि देशाचेही लक्ष लागले आहे.
मात्र, या वाद सोडविण्यासाठी सर्वात महत्वाचे ठरणार आहे ती लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांची आकडेवारी. कोणत्या गटाकडे किती लोकप्रतिनिधी आणि किती पदाधिकारी आहेत याचा अभ्यास करुनच आयोग निर्णय देत असल्याचे आतापर्यंत विविध दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची हा निर्णयही आकड्यांच्या खेळावरच अवलंबुन असल्याचे चिन्ह आहे. दरम्यान, हीच आकडेवारी आता ‘मुंबई तक’ च्या हाती लागली आहे.
शिंदे आणि ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून कोणत्या गटाकडे किती लोकप्रतिनिधी अन् किती पदाधिकारी आहेत, याची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. तिच आकडेवारी आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत.