‘सत्ताधाऱ्यांचे संस्कार आणि वैचारिक लायकी दिसली;’ सुषमा अंधारेंनी आदित्य ठाकरेंच्या पोस्टर्सवरून बरंच सुनावलं

मुंबई तक

‘कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. या न्यायाने ज्या सत्ताधाऱ्यांची स्वतःची दिशा चुकलेली असताना इतरांची दिशा चुकलेली आहे, असं म्हणणं हस्यास्पद आहे.’ असा खोचक टोला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लगावला आहे. शिंदे गटाने गुरुवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी बॅनर झळकावले. ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (पपू) युवराज’, युवराजची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

‘कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. या न्यायाने ज्या सत्ताधाऱ्यांची स्वतःची दिशा चुकलेली असताना इतरांची दिशा चुकलेली आहे, असं म्हणणं हस्यास्पद आहे.’ असा खोचक टोला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लगावला आहे. शिंदे गटाने गुरुवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी बॅनर झळकावले. ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (पपू) युवराज’, युवराजची कायमच दिशा चुकलेली, असा मजकूर असलेल्या बॅनरवर आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करण्यात आलीये.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. या न्यायाने ज्या सत्ताधाऱ्यांची स्वतःची दिशा चुकलेली असताना इतरांची दिशा चुकलेली आहे, असं म्हणणं हस्यास्पद आहे. चोर ते चोर वरून शिरजोर ही म्हण अशाच प्रवृत्तीच्या लोकांचं वागणं-बोलणं बघून रूढ झालेली असणार, असा टोला अंधारेंनी लगावला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज जी पोस्टर्सबाजी झाली, ती विधिमंडळाच्या गौरवशाली परंपरेला गालबोट लावणारी आहेच सोबतच यातून सत्ताधाऱ्यांचे संस्कार आणि वैचारिक लायकी दिसून आली, असा निशाणा सुषमा अंधारेंनी साधला.

सत्ताधारी सभागृहात प्रश्न सोडवण्यासाठी असतात. मात्र पायऱ्यांवरती तेच आंदोलनं आणि घोषणाबाजी करत असतील तर महाराष्ट्राच्या जनतेने न्याय कुणाकडे मागायचा? असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला. या सगळ्या गलिच्छ राजकारणामागे सूत्रधार असणारे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की आपण जी पाताळयंत्री राजकारण करत आहात. जी हुल्लडबाजी महाराष्ट्रामध्ये चालवली आहे, ती महाराष्ट्राची जनता ओळखून आहे. यावरून आपल्याला लोकांच्या प्रश्नांशी किती देणंघेणं आहे, यावर लोक विचार करत आहेत, अशी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली.